शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रेनवॉटर हार्वेस्टिंगविना कार्यालये

By admin | Updated: July 17, 2014 00:42 IST

बुलडाणा : जिल्हाधिकारी, प्रशासकीय, तहसील, नगरपालिका, पंचायत समिती आदी कार्यालयांचा समावेश

बुलडाणा : जेथून नियम पाळण्याचे आदेश होतात. त्या जिल्हाधिकारी कार्यालयातच नियमाला हरताळ लावल्या जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध विभागाच्या एकूण आठ ईमारती आहेत. यातील नव्याने बांधलेल्या दोन इमारती वगळता एकाही इमारतीला आतापर्यंंत रेन वाटर हार्वेस्टींग केलेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाची इंग्रजकालीन इमारत आहे. या जुन्या इमारतीमध्ये विविध विभाग आहेत. या इमारतीच्या पाठीमागील भागाला पनाळ लावून दोन ठीकाणी पाईपद्वारे पाणी जमिनीत सोडल्याचे दिसते. मात्र आता त्याचीही तोडफोड झाली आहे. इमारतीच्या समोरील भागाचे पावसाचे पडलेले पाणी मात्र, तसेच वाया जाते. जून्या इमारतीच्या समोर आणि पाठीमागे अलीकडेचे नव्याने दोन प्रशस्त इमारती बांधल्या आहेत. या इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टींग केलेले दिसते. मात्र, याच परिसरात असलेल्या पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालय, उ पनिबंधक कार्यालय, विशेष भुसंपादन अधिकारी कार्यालय, पुरवठा कार्यालय ह्या विभागाच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या ईमारती आहेत. मात्र एकाही इमारतीला पावसाचे पडलेले पाणी आडवून ते जिरवण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाचे पडलेले लाखो लिटर पाणी वाया जाते. *पंचायत समिती, बुलडाणा ग्रामीण भागातील जनतेला पाणी आडवा, पाणी जिरवा चे सल्ले देण्या बरोबरच शासनाच्या ग्रामविकासाच्या विविध योजना राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या पंचायत समितीच्या इमारतीलाच रेन वॉटर हार्वेस्टींगची व्यवस्था करण्यात आली नाही. *नगरपालिका, बुलडाणा रेन वॉटर हार्वेस्टींग करण्याची हमी दिल्याशिवाय बांधकामाची परवानगी न देणार्‍या बुलडाणा नगरपालिकेलाच रेन वॉटर हार्वेस्टींगचे वावडे असल्याचे दिसून आले. बुलडाणा नगरपालिकेचा कारभार आजही इंग्रजकालीन इमारतीत सुरू आहे. मात्र या इमारतीला पाईप लावून रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाळ्यात येणारे लाखों लिटर्स पाणी वाया जाते.*बुलडाणा तहसील कार्यालय बुलडाणा तहसील कार्यालय असलेल्या जुन्या इमारतीत निवडणूक विभाग, निराधार योजना, पुरवठा विभाग तसेच तहसीलदार यांचे कार्यालय आहे. मात्र या इमारतीलाही रेनवॉटर हार्वेस्टिंगचे वावडे असल्याचे दिसून येते. *प्रशासकीय इमारत, बुलडाणाजिल्ह्याचा १६ विभागाचा प्रशासकी कामकाज येथील बसस्थानक समोर असलेल्या प्रशासकीय इमारतीतून चालत असतो. काही दिवसापूर्वी या इमार तीच्या तिसर्‍या मजल्यावर उपनिबंधक व भूमिअभिलेख कार्यालय सुरू करण्यात आले. यावेळी इमारतीची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली. मात्र रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.*टीम लोकमतने असे केले स्टिंग ऑपरेशनबुलडाणा शहरातील काही निवडक शासकीय कार्यालयाची निवड केली. त्याठिकाणी लोकमतच्या प्रतिनिधींनी बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ च्या दरम्यान निवडलेल्या शासकीय कार्यालय परिसरात जाऊन पहाणी केली. निवडलेल्या कार्यालयापैकी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन इमारतीत रेनवॉटर हार्वेस्टींग केल्याचे दिसून आले. तर इतर शासकीय कार्यालयात फक्त पनाट लावलेले होते. तर काही ठिकाणी पाईपची तुटफुट झालेली होती.