शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पिकांना जीवदान; मात्र नदीनाले कोरडेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:36 IST

जळगाव जामोद : गत तीन दिवसांत जळगाव जामोद तालुक्यात पडलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले, तरी नदीनाले मात्र कोरडेच आहेत. त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी खालावलीच आहे. सोबतच तालुक्यातील तीन लघुसिंचन प्रकल्पांमध्ये फक्त १७ टक्के पाणी असल्याने सिंचन व पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देतालुक्यातील धरणात अत्यल्प जलसाठा, पाणी समस्या कायमसर्वाधिक पाऊस जळगावात, जामोदमध्ये सर्वात कमी 

जळगाव जामोद : गत तीन दिवसांत जळगाव जामोद तालुक्यात पडलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले, तरी नदीनाले मात्र कोरडेच आहेत. त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी खालावलीच आहे. सोबतच तालुक्यातील तीन लघुसिंचन प्रकल्पांमध्ये फक्त १७ टक्के पाणी असल्याने सिंचन व पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.जळगाव जामोद तालुक्यात वर्षभरात सरासरी पाऊस ६८३ मि.मी झाला आहे. म्हणजे फक्त ६३ टक्के पाऊस झाला आहे. या पावसाने नदी नाल्यांना पूर आला नाही. सध्या सर्व नद्या व नाले कोरडे आहेत. त्यामुळे विहिरींची पातळी अजूनही अत्यंत खालावलेली आहे. आता पावसाळ्याचा फक्त एक महिना बाकी आहे. १६ ऑगय्टपासून मद्या नक्षत्राला सुरुवात झाली आता पावसाचे पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती हे नक्षत्र बाकी असले तरी उत्तरा नक्षत्रानंतर पावसाची शक्यता मावळत जाते. नदी नाल्यांना पूर गेल्याशिवाय विहिरींची पाण्याची पातळी वाढत नाही. विहिरींची पाण्याची जर वाढली नाही तर रब्बी हंगामातील पिके घेणे कठीण होणार आहे. सोबतच पिण्याच्या पाण्याचीही समस्या भेडसावणार आहे.जळगाव तालुक्यात राजुरा, गोडाडा व धानोरा अशी तीन छोटी धरणे आहेत. राजुरा धरणात सध्या १९.८0 टक्के जलसाठा आहे. म्हणजेच हे धरण ८0 टक्के खाली आहे. तसेच गोडाडा धरणात १६.६५ टक्के जलसाठा आहे. याचा अर्थ हे धरण ८४ टक्के रिते आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही धरणावरून पाणीपुरवठा योजना आहेत. राजुरा धरणावरून आसलगाव व खर्डा या गावांना पाणी पुरवठा केला जातो. तर गाडोडा धरणावरून जळगाव जामोद शहराची तहान भागविली जाते. येत्या महिन्याभरात जर धुवाधार पाऊस झाला नाही आणि ही धरणे अशीच रिती राहिली तर या गावांची पिण्याच्या पाण्याची काय स्थिती होईल, याची कल्पनाही करू शकत नाही. धानोरा धरणात फक्त १६.१६ टक्के जलसाठा आहे. या धरणावरून कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही. तसेच या धरणाचे पाणी सिंचनासाठी फार वापरले जात नाही; परंतु हे धरण जर रिकामे राहिले तर सभोवतालाच्या सर्व विहिरी या कोरड्या होतात. त्यामुळे मानवासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची मोठी समस्या तयार होते.एकूणच गत तीन दिवसांत पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली झाली आहे. सर्व खरीप पिकांना अक्षरश: जीवदान मिळाले आहे; परंतु विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ न होणे, धरणात जलसाठा अत्यंत कमी असणे व नदीनाले कोरडे असणे, ही बाब अत्यंत चिंतेची झाली आहे. सन २0१६ मध्ये २२ ऑगस्टपर्यंत जळगाव तालुक्यात सरासरी पाऊस ४९0 मि.मी. झाला होता. तर सन २0१६ मध्ये याच तारखेपर्यंत ५४0 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी फक्त ४३३ मि.मी. पाऊस झाला म्हणजेच मागील दोन्ही वर्षांपेक्षा यावर्षी सध्यातरी पाऊस कमी आहे. येत्या एक महिन्यात जर पावसाने ही सरासरी वाढविली नाही तर तालुक्याची स्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते.

सर्वाधिक पाऊस जळगावात, जामोदमध्ये सर्वात कमी जळगाव तालुक्यात जळगाव, जामोद, वडशिंगी, आसलगाव व पिंपळगाव काळे, अशा पाच मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे. २२ ऑगस्टपर्यंत सर्वाधिक ५३२ मि.मी. पाऊस जळगाव येथे झाला तर सर्वात कमी ३३६ मि.मी. पावसाची नोंद जामोद येथे झाली आहे. म्हणजे जळगाव व जामोद या १0 कि.मी. अंतरात २00 मि.मी. पावसाचा फरक आहे. मंगळवारपर्यंत वडशिंगी येथे ४५६, आसलगाव येथे ३९३ तर पिंपळगाव काळे येथे ४४८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याचाच अर्थ तालुक्यात सर्वत्र सारखा पाऊस नाही. मोठी तफावत दिसून येते याचाही परिणाम पिकांच्या स्थितीवर होत असतो.