शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 15:43 IST

फुटलेला कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोंगून ठेवलेल सोयाबीन व नुकताच फुटलेला कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही खरीप हंगामाच्या शेतीमालाच्या नुकसानाची पुनर्रावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. परीणामा अंतिम पैसेवारीलाही फटका बसण्याची शक्यता आहे.यंदाही आगामी पाच दिवस विदर्भामध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन खराब होण्याची भीती आहे. सप्टेंबरमध्ये पिकाला लागलेल्या शेंगातील दाण्यांनाच कोंब फुटले होते. सध्या सोंगलेले सोयाबीन हे जमीनीवरच असल्याने त्याला फटका बसून प्रतवारी घटण्याची भीती आहे. रविवारी जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा परतीचा पाऊस झाल्यामुळे शेतातील सोयाबीनच्या सुड्या भिजल्या. नुकतीच फुटलेली कापसाची बोंडेही फुटल्याने नुकसान झाले. काही ठिकाणी बोंडे काळवंडल्याचे दिसून येत आहे.बुलडाणा, चिखली, खामगाव, मलकापूर, मोताळा, जळगाव जामोद, नांदुरा, शेगाव, लोणार, देऊळगाव राजा, मेहकर , संग्रामपूर, नांदुरा तालुक्यातही हा पाऊस जोरदार बरसला त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. येत्या पाच दिवसातही परतीचा पाऊस मुसळधार बरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील स्थिती ही या परतीच्या पावसासाठी पोषक असल्याने क्यार व महा चक्रीवादळाप्रमाणेच यंदाही हा पाऊस बरसून मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मका, कापूस, तूर, सोयाबीन व भाजीपाला पिकांचेही नुकसान होत आहे. जिल्ह्यात यंदा तीन लाख ६६ हजार हेक्टरवर सोयाबीन तर १.९४ लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला असून त्याला या पावसाचा फटका बसण्याची भीती आहे.तर गेल्या वर्षी ४७८ कोटी रुपयांचे नुकसान ११ दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती