शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची संततधार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:30 IST

बुलडाणा: मागील चार आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाने  शुक्रवार रात्रीपासून जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली  आहे. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असून, शनिवारी  रात्रीपासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद  सरासरी २४.६ मि.मी. करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकमी-जास्त प्रमाणात हजेरीपावसामुळे पिकांना जीवनदान रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी २४.६ मि.मी. पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मागील चार आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाने  शुक्रवार रात्रीपासून जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली  आहे. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असून, शनिवारी  रात्रीपासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद  सरासरी २४.६ मि.मी. करण्यात आली आहे.जिल्ह्यात मागील चार आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे  पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती. तर अनेक  ठिकाणच्या पिकांचे पावसाअभावी उत्पादनात घट होणार आहे.  अशा परिस्थितीत जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने सुरुवात  केली आहे. या पावसामुळे काही पिकांना जीवनदान मिळणार  असून, अनेक प्रकल्प परिसरातील उन्हाळ्यातील पिण्याचा  पाण्याची समस्या दूर होणार आहे. यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानं तर आजपर्यंत सरासरी ४५७.४ मि.मी. पाऊस झाला असून,  शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी  २४.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात  बुलडाणा तालुक्यात ३९.0 मि.मी., चिखली १८.0, देऊळगाव  राजा २२.0, मेहकर २७.0, लोणार २0.0, सिंदखेड राजा १९.८,  मलकापूर ३६.0, नांदुरा ३0.0, मोताळा ४५.0, खामगाव १९.४,  शेगाव २३.0, जळगाव जामोद ११.0, संग्रामपूर तालुक्यात ८.0  मि.मी. पावसाची नोंद  करण्यात आली आहे.

पावसाचा पोळ्याचा बाजारावर परिणामबुलडाणा: शहराचा आठवडी व पोळ्याचा बाजार २0 ऑगस्ट  रोजी येथील जयस्तंभ चौक परिसरात भरला होता. यावेळी ग्रामीण  भागातील नागरिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती; मात्र  सकाळपासून रिमझिम व संततधार पावसामुळे अनेक व्यापारी व  भाजीपाला विक्रेत्यांची धावपळ झाली. अनेकांना बसण्यासाठी  जागा मिळाली नाही.