शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रायमुलकरांचे धरणात आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST

हिवरा आश्रम : पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे अनेक शेतकरी बाधित झाले आहेत. कालव्यातून पाणी पाझरत असल्यामुळे त्यांच्या जमिनी नापिकी झाल्या ...

हिवरा आश्रम : पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे अनेक शेतकरी बाधित झाले आहेत. कालव्यातून पाणी पाझरत असल्यामुळे त्यांच्या जमिनी नापिकी झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी करूनही संबंधित विभागाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार संजय रायमुलकर यांनी पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात शेतकऱ्यांसह आंदाेलन सुरू केले. या आंदाेलनाची अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने आमदार रायमुलकर यांनी धरणाच्या पाण्यात उडी घेतली. त्यामुळे, प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली हाेती़. तरफ्यावर असलेल्या लाेकांनी आमदारांना वाचवले. एक महिन्याच्या आत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी सायंकाळी आपले आंदाेलन मागे घेतले.

पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे दुधा, रायपूर ,पेनटाकळी या शिवारात प्रकल्पातून पाणी पाझरत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत जमिनी नापिकी झाल्या आहेत. ठिकठिकाणी या कालव्याला भगदाड पडले आहेत. या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे झिरो ते अकरा किलोमीटरपर्यंतचा कालवा बंद करून पेनटाकळी प्रकल्पातून पाणी हे बंद नलिकेद्वारे नेण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीचा पाठपुरावा खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर हे वेळोवेळी करीत आहेत. मात्र, त्याकडे अधिकाऱ्यांकडून सातत्याने दुर्लक्ष हाेत आहे. अधिकारी याची दखल घेत नसल्याने आमदार रायमुलकर यांनी सोमवारी प्रकल्पाच्या पाण्यात बसून आंदोलन केले.

अन् आमदारांनी घेतली पाण्यात उडी

सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आमदार रायमुलकर हे प्रकल्पाच्या पाण्यात उतरले. मात्र, या आंदोलनाची कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. यामुळे आमदार रायमुलकर यांनी पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात उडी घेतल्यानंतर सर्व यंत्रणेची तारांबळ उडाली. पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात तरफ्यावर बसलेले रामा अत्तरकर व पोलीस कर्मचारी काशीकर यांनी त्यांना वाचविले. त्यानंतर त्या ठिकाणी दुपारी ४ वाजता अधिकारी दाखल झाले. खासदार जाधव यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, दिलीपबापू देशमुख, कार्यकारी अभियंता राळेकर, तहसीलदार डाॅ. संजय गरकल, सिध्देश्वर पवार, एकनाथ सास्ते यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात. अन्यथा यापुढे शेतकऱ्यांसह स्वतःच्या कुटुंबासोबत पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात आंदोलन करण्यात येईल.

आमदार डॉ. संजय रायमुलकर, मेहकर