शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

एशियाड बसच्या भाड्यातून प्रवाशांची लूट! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:32 IST

बुलडाणा : एस.टी. महामंडळाच्यावतीने एशियाड बस सुरू  करण्यात आल्या होत्या. या बसचे भाडे हे साधारण बसपेक्षा  कितीतरी जास्त आहे; मात्र या बसमध्ये कोणत्याही अतिरिक्त  सुविधा नसून, बस भंगार झाल्या आहेत.    

ठळक मुद्देएशियाड बस झाल्या खिळखिळ्याआसन तुटले-कुशनही फाटले

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : एस.टी. महामंडळाच्यावतीने एशियाड बस सुरू  करण्यात आल्या होत्या. या बसचे भाडे हे साधारण बसपेक्षा  कितीतरी जास्त आहे; मात्र या बसमध्ये कोणत्याही अतिरिक्त  सुविधा नसून, बस भंगार झाल्या आहेत.    प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याकरिता एसटी  महामंडळाच्यावतीने एशियाड बस सुरू करण्यात आली.  यामध्ये साधारण बसच्या तुलनेत बसण्याकरिता सिटवर  वेगळे कुशन तसेच हात ठेवण्याकरिता हॅण्डल, अन्य  बसच्या तुलनेत कमी थांबे देण्यात येत होते. त्यामुळे या  बसचे भाडे साधारण बसच्या तुलनेत वाढविण्यात आले.  साधारण बसचे भाडे प्रती स्टेज (सहा किमीची एक स्टेज) ८  रुपये ३0 पैसे आकारण्यात येते तर एशियाड बसचे भाडे प्रती  स्टेज ६.६0 पैसे आकारण्यात येते. एशियाड बसच्या भाड्यात  प्रती स्टेज ३0 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे  बुलडाणा ते खामगाव पन्नास किमीच्या अंतरावर प्रवाशांना  साधारण बसच्या तुलनेत २३ रुपये अधिक द्यावे लागतात.  तर बुलडाणा अकोला या १00 किमीच्या अंतरावर प्रवास  करण्याकरिता प्रवाशांना साधारण बसच्या तुलनेत  ४२ रुपये  अधिक द्यावे लागतात. १00 किमीच्या प्रवासाकरिता ४२ रु पये जास्त दिल्यानंतर एशियाड बसमध्ये कोणत्याही  प्रकारच्या सुविधा नसतात तर उलट या बस भंगार झाल्या  आहेत. बसमधील कुशन फाटले असून, सिट तुटल्या आहे त. एकाही बसमध्ये हात ठेवण्याकरिता असलेले हॅण्डल  बरोबर नाही. या बसचे साधारण बसप्रमाणेच सर्व थांबे आहेत. त्यामुळे  प्रवाशांच्या वेळेचीही बचत होत नाही. कोणत्याही प्रकारच्या  अतिरिक्त सुविधा नसताना वेळेचीही बचत होत नसल्यामुळे  प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे का घेण्यात येतात, असा प्रश्न उ पस्थित होत आहे. 

एशियन गेमवरून पडले एशियाड नाव १९८२ साली भारतात एशियन स्पर्धा झाल्या होत्या. या स्पर्धेत  संपूर्ण आशिया खंडातील खेळाडू सहभागी झाले होते. या  खेळाडूंना मैदान ते निवास व्यवस्था तसेच विविध शहरातील  मैदानांवर ने-आण करण्याकरिता काही बस तयार करण्यात  आल्या होत्या. नंतर या बस महाराष्ट्रात एस टी महामंडळाला  देण्यात आल्या. एशियन स्पर्धेपासून या बस देण्यात  आल्यामुळे बसला एशियाड बस असे नाव पडले. 

एशियाड बसमध्ये कोणत्याही अतिरिक्त सुविधा न देता जास्त  भाडे आकारून प्रवाशांची लूटच करण्यात येत आहे.  बसमध्ये बसल्यावर प्रवाशाला आपण एशियाड बसमध्ये  असल्याचे कळते व त्याची फसवणूक होते. या बसचे  भाडेही साधारण बस प्रमाणेच करायला हवे.- विनय इसोकार, अध्यक्ष, प्रवासी संघटना, बुलडाणा   

एशियाड बसमध्ये सिटला कुशन बसविण्यात आले आहेत.  तसेच या बसमध्ये उभ्याने प्रवाशांना प्रवास करू दिल्या जात  नाही.   आरामदायी प्रवास व्हावा, याकरिता या बस तयार  करण्यात आल्या आहेत. राज्यभर अशाप्रकारे एशियाड बस  धावत आहेत.  - दीपक साळवे, स्थानक प्रमुख, बुलडाणा बसस्थानक.