माेताळा : तालुक्यातील तरवाडी शिवारात सुरू असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ मार्च राेजी धाड टाकून नऊ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ४ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
तरवाडी शिवारात जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून विनोद साहेबराव तायडे ( रा. वरखेड), दीपक ज्ञानदेव नारखेडे (रा. निमखेड), ज्ञानेश्वर श्रीराम जंजाळ (रा.वरखेड), रघुनाथ त्र्यंबक तायडे (रा. वरखेड), विठ्ठल गुलाबराव शिंगोटे (रा.जवळा बाजार), प्रवीण मारुती म्हैसागर (रा. पिंपळखुटा), अजय पुरुषोत्तम तायडे (रा. वरखेड), सहदेव वसंतराव म्हैसागर (रा. पिंपळखुटा), भगवान विश्वनाथ शिंगोटे (रा. जवळा बाजार) यांच्यावर कारवाई केली. काही आराेपी घटनास्थळावरून पसार झाले. त्यांच्याकडून राेख रक्कम व जुगाराचे साहित्य २६ हजार ४० रुपये, आठ मोबाइल किंमत ५९ हजार रुपये, आठ दुचाकी किंमत ३ लाख ८० हजार, असा एकूण ४ लाख ६५ हजार ४० रुपयांचा ऐवज जप्त केला. आराेपीविरुद्ध बाेराखेडी पाेलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास बाेराखेडी पाेलीस करीत आहेत.