जिल्हा अधिकारी एस. रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद विसपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. रवींद्र गोफणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम शिबिर राबविण्यात येत आहे. किनगावराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोडखे व डॉ. शिवानी नायक यांच्या नेतृत्वाखालील १९० लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या वेळी आरोग्य सेवक एस.पी. खरात, व्ही.पी. राऊत तसेच अंगणवाडी कर्मचारी व आशासेविका स्वाती देशमुख, मालती देशमुख, कविता देशमुख, रंजना देशमुख, अंतकला जाधव, गोदावरी राऊत, रोहिनी देशमुख, निर्मला सोनुने, सिंधू गवई, अलका देशमुख यांची उपस्थिती होती. तसेच गावातील सरपंच रवी बरांडे, उपसरपंच सुभाषराव देशमुख, कोकिळा गवई, ग्रामपंचायत सदस्य शंकर दधरे, बालाजी देशमुख, किशोर देशमुख यांचे सहकार्य लाभले.
राहेरी बु. येथे कोविड लसीकरण शिबिर यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:14 IST