शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

रब्बी हंगामाचे नियोजन अडीच लाख हेक्टर; पेरा मात्र २७६२ क्षेत्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 15:09 IST

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असल्याचे चित्र आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कृषी विभागाच्यावतीने अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतजमिन ओली असल्याने पेरणीला विलंब झाला. यामुळे अनेक ठिकाणच्या पेरण्या अद्यापही खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असल्याचे चित्र आहे.यावर्षी कृषी विभागाने सुरूवातीला १ लाख ५७ हजार ७३ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे नियोजन केले होते. मात्र परतीच्या पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर गेल्याने कृषी विभागाला सुधारीत नियोजन करावे लागले होते. त्यानुसार रब्बीचे प्रस्तावित क्षेत्र २ लाख ४२ हजार ८१६ हेक्टरवर पोहचले होते. दमदार पावसामुळे जमिनीमध्ये चांगला ओलावा असल्याने सिंचनाची व्यवस्था नसलेले शेतकरी देखील रब्बी पिकांची लागवड करणार असल्याची शक्यता असल्याने हे वाढीव नियोजन करण्यात आले होते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुधारीत नियोजनानुसार रब्बीचे क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. आता नोव्हेंबर महिना संपायला आला असताना जिल्ह्यात केवळ २ हजार ७३२ हेक्टरवर प्रत्यक्षात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार संग्रामपूर व सिंदखेडराजा तालुक्यात पेरणीला सुरुवात झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात ५० हेक्टर गहू तर ५७ हेक्टर हरभरा आणि सिंदखेडराजा तालुक्यात २ हजार ६४७ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची लागवड करण्यात आली आहे.परतीच्या पावसामुळे जवळपास महिनाभर मुक्काम ठोकल्यामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर गेली. आॅक्टोबरसह नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू होता. रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीस विलंब झाल्यास उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता असते.यामुळे आधीच खरीप हंगाम हातचा गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके घेणे टाळले असल्याचे दिसून येत आहे.अद्यापही पेरणी अत्यल्पयावर्षी पावसाळा चांगला झाल्याने जलस्त्रोतांमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकुण ९१ प्रकल्प आहेत. यापैकी ३ मोठे, ७ मध्यम तर ८१ लघु प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्प पूर्णपणे भरलेले आहेत. जिल्ह्यात सध्या ९८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. यामुळे यावर्षी सिंचनासाठी भरपुर पाणी उपलब्ध आहे. याचा फायदा खरीप हंगामातील पिकांना होणार असल्याचे सुखद चित्र दिसत आहे. मात्र ऐन रब्बी पेरणीच्या वेळेवरच सतत पाऊस सुरू राहिला. यामुळे पेरणीला विलंब झाल्याने आतापर्यंत अपेक्षित पेरणी झाली नाही. असे असले तरी अजुन १५ डिसेंबरपर्यंत पेरणीसाठी अवधी असल्याने यामध्ये वाढ होऊ शकते.चारा पिकांसाठी पोषक वातावरणयावर्षी जमिनीमध्ये भरपूर ओलावा असूनदेखील रब्बी हंगामाच्या क्षेत्रात सध्यातरी घट झाल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती चारा पिकांसाठी मात्र लाभदायी आहे. विलंबाने पेरणी झाल्यास इतर पिकांप्रमाणे चारा पिकांवर याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सध्या उद्भवला आहे. भविष्यात आणखी चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यावर्षी जमिनीमध्ये असलेला ओलावा व पुरेसी सिंचनाची व्यवस्था यामुळे काही प्रमाणात का होईना, पण पशुपालकांना दिलासा मिळणार आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती