शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

रब्बीच्या आशा पल्लवीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:39 IST

सातत्याने अवर्षणसदृश स्थितीचा सामना करणार्‍या  बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने  जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी गाठली आहे. जिल्ह्यातील  १३ तालुक्यांपैकी सात तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी  ओलांडली असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या  असून, जमिनीतील ओलावा गहू पिकासाठी पोषक ठरत आहे. 

ठळक मुद्देजमिनीतील ओलावा गव्हाला ठरतोय पोषक अर्ध्या जिल्ह्यात पावसाने पार केली सरासरी

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सातत्याने अवर्षणसदृश स्थितीचा सामना करणार्‍या  बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने  जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी गाठली आहे. जिल्ह्यातील  १३ तालुक्यांपैकी सात तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी  ओलांडली असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या  असून, जमिनीतील ओलावा गहू पिकासाठी पोषक ठरत आहे. जिल्ह्यात सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात असून, खरीप  हंगामानंतर आता शेतकरी रब्बीच्या तयारीला लागला आहे.  जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र ९२ हजार ८५१ आहे.  खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसावरच खरिपाची  िपके तग धरून होती. मध्यंतरी पावसाने पाठ फिरवल्याने  जलसाठय़ांनीसुद्धा तळ गाठला होता; परंतु परतीच्या पावसाने  जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी भरून काढली आहे.   जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामाला संजीवनी मिळाली  आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १00.६७ टक्के पाऊस झाला  आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी बुलडाणा, चिखली,  देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मलकापूर, मोताळा आणि  जळगाव जामोद या सात तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी  ओलांडली आहे. बुलडाणा तालुक्यात १३१.८0 टक्के,  चिखली १0२.४९ टक्के, देऊळगाव राजा १0७.२६, सिंदखेड  राजा १0३.७५ टक्के, लोणार ८९.५२ टक्के, मेहकर ९३.२१  टक्के, खामगाव ९५.३१ टक्के, शेगाव ७३.१६ टक्के, मलका पूर ११0.११ टक्के, नांदुरा ९६.५५ टक्के, मोताळा १0१.३७  टक्के, संग्रामपूर ८५.९४ टक्के, जळगाव जामोद ११६.२५ ट क्के पर्जन्यमान झालेले आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांत  पावसाने सरासरी ओलांडली असल्याने जलस्रोतामध्ये चांगला  जलसाठा आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये रब्बी हंगामाची पिके  घेण्यासाठी शेतकरी जोमाने तयारी करत आहे.  

जिल्ह्यात ९२ हजार ८५१ हेक्टर रब्बीचे क्षेत्रजिल्ह्यात रब्बी हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र ९२ हजार ८५१ हे क्टर आहे. त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्याचे ४ हजार ८३२,  संग्रामपूर ४ हजार २३८, चिखली तालुक्यात २५ हजार ९१,  बुलडाणा १७ हजार ५२१, देऊळगाव राजा १२ हजार १७७,  मेहकर २४ हजार २१, सिंदखेड राजा १0२४३, लोणार १४  हजार ६0८, खामगाव ८ हजार ७४६, शेगाव ४ हजार ३0३,  मलकापूर तालुक्यात २ हजार २५८, मोताळा ३ हजार ७७१,  नांदुरा २ हजार ५८४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. 

रब्बी पेरणीला सुरुवात जिल्ह्यात सोयाबीन काढणीच्या हंगामानंतर आता रब्बी  हंगामाच्या पेरणीसाठी शेतीची मशागत करण्याचे काम जोमात  सुरू आहे. रब्बी पेरणीपूर्वी शेत वखरण्याचे काम सध्या जोमात  सुरू आहे, तर काही ठिकाणी रब्बी पेरणीला सुरूवातही झाली  आहे. 

टॅग्स :agricultureशेती