शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

माती तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

बुलडाणा : चिखली तालुक्यातील आमखेड येथील माती तलाव फुटल्यामुळे चिखली, सिंदखेड राजा आणि मेहकर तालुक्यातील लगतच्या भागातील शेतीचे मोठे ...

बुलडाणा : चिखली तालुक्यातील आमखेड येथील माती तलाव फुटल्यामुळे चिखली, सिंदखेड राजा आणि मेहकर तालुक्यातील लगतच्या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील माती तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत असलेल्या जलसंधारणाच्या ८६९ स्ट्रक्चरपैकी तब्बल १८८ स्ट्रक्चरची कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

आमखेड येथील दुर्घटनेनंतर यासंदर्भात माहिती घेतली असता जलसंधारण विभागाकडे (लोकल सेक्टर) १७ फेब्रुवारी २०२१च्या राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार ही कामे सोपविण्यात आली होती. मात्र अद्यापही या कामासंदर्भात हालचाली झालेल्या नाहीत. पावसाळ्यामुळे आता ही कामे दिवाळीनंतरच होतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. दुसरीकडे या १८८ स्ट्रक्चरपैकी ६२ स्ट्रक्चरची कामे करण्यास पूर्वीच प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु त्यासंदर्भातील निविदा झालेल्या नव्हत्या. आता या दुर्घटनेनंतर सुमारे आठ कोटी ५० लाख रुपयांच्या या कामांच्या निविदा काढण्यात येत असल्याचे जलसंधारण विभागाचे अधिकारी राजू झोरावत यांनी सांगितले. दरम्यान, आपण रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही ते म्हणाले.

--जि.प. सिंचन विभागाचा डोलारा मोठा--

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे ७५ सिंचन तलाव, ३४५ पाझर तलाव, १९८ गाव तलाव आणि २०१ कोल्हापुरी बंधाऱ्याचे व्यवस्थापन आहे. या माध्यमातून १९ हजार ५०० हेक्टरच्या आसपास या विभागाची महत्त्म सिंचन क्षमता आहे. मात्र बहुतांश स्ट्रक्चर हे जुने झालेले आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीचीही गरज निर्माण झालेली आहे.

-आमखेडचा माती तलाव जुना-

जिल्हा परिषदेंतर्गतचा आमखेडचा माती तलाव हा १९८०च्या दशकातला आहे. तो २८ जून रोजी झालेल्या दमदार पावसादरम्यान फुटल्याने या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले. परिसरातली अेाढ्यांनाही या काळात पूर आल्याने हे पाणी नदीनाल्यात सामावू शकले नाही व शेतीमध्ये ते घुसल्याने मोठे नुकसान झाले. दुसरीकडे आमखेडनजीकच असलेला अंबाशी येथील तलाव मात्र सुरक्षित असल्याचे जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे अभियंता पवन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी पाहणी केली आहे.