शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी संकुल बांधकामावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: May 17, 2017 00:41 IST

शासनाकडून पूर्व मान्यता न घेतल्याचा ठपका: मेहकर न.प.मुख्याधिकाऱ्यांना नगर विकास मंत्रालयाकडून पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: काँग्रेसच्या कारकिर्दीत नगर परिषदेने शहरात बांधा, वापरा व हस्तांतरीत करा, या तत्त्वाने बांधलेल्या भव्य अशा राजीव गांधी व्यापारी संकुलाचे काम शासनाची पूर्वमान्यता न घेता, तत्कालीन न. पा.अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी केलेला सामंजस्य करार हा अधिकारबाह्य ठरत असल्याचा ठपका नगर विकास मंत्रालयाने ठेवत हा करार रद्द का करण्यात येऊ नये, याबाबत विचारणा करणारे पत्र मुख्याधिकारी मेहकर यांना पाठविल्याने खळबळ उडाली आहे.१६ मे २०१७ च्या नगर विकास विभागाच्या या निर्णय पत्रात म्हटले की मेहकर नगरपालिकेने बांधा, वापरा व हस्तांतरण करा, या तत्त्वावर दुकान संकुलाचे बांधकामास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक न.पा.संचालनालयाकडे पाठविला होता. सदर प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन असतानाच २०१४ मध्ये शासनाच्या मान्यतेशिवाय न.पा.ने निविदा प्रक्रिया पार पाडून २२ एप्रिल २०१३ रोजी कामाचा आदेश देण्यात आला. या दरम्यान न.पा.ने दुकान संकुल बांधून पट्टेदारास ३० वर्षाच्या करार तत्त्वावर दिला. वास्तविक न.पा.अधिनियमानुसार न.पा.ला जास्तीत जास्त तीन वर्षाच्या कालावधीसाठी आपली स्थावर मालमत्ता पट्ट्याने देता येते. पट्टेदारास अशा मालमत्तेवर कोणतेही कायम बांधकाम करता येत नाही. मेहकर न.पा.चा दुकान संकुलाचा प्रस्ताव ३० वर्षासाठी असून, शासनाची मान्यता न घेता कार्यादेश देण्याची कार्यवाही न.पा.ने केलेली आहे. सदर प्रस्तावात काही त्रुटीसुद्धा आढळून आल्या आहेत. त्यात विकासकामे गाळे धारकाकडून किती प्रीमियम घ्यावा, याचा उल्लेख नाही. भाडे निश्चित करताना मजलेनिहाय प्रति स्क्वे.फूट दर ठरविण्यात आला आहे, त्याचीही कारण मीमांसा दिसून आली नाही. कंत्राटदाराने ही दुकाने ३० वर्षांकरिता ठेवण्यासाठी दोन्ही स्थितीत न.प.चे भाडेकरी या नात्याने कंत्राटदारास परवाना देण्यात येईल.तथापि त्यास त्या जागेवर दुकानावर कोणताही मालकी हक्क प्रस्थापित करता येणार नाही. न.प.ने ठराव क्रमांक दोन २८ सप्टेंबर २०१२ अन्वये कार्यादेश देण्यापूर्वी शासनाची मान्यता घ्यावी, असा ठराव पारित केला असताना कार्यादेश देण्यापूर्वी शासनाची मान्यता घेतली नाही. त्यामुळेच नगर विकास विभागाने स्पष्टच निर्णय घेतला की, शासनाची पूर्व मान्यता न घेता विकासकासोबत नगर पालिका अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी केलेला सामंजस्य करार अधिकार बाह्य ठरत असल्याने तो रद्द का करण्यात येऊ नये. याबाबत १५ दिवसात संबंधितांना अभिवेदन करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राजीव गांधी कॉम्प्लेक्स प्रकरण काय वळण घेते. याकडे मेहकरवासीयांचे लक्ष लागले आहे.