शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला नगरपालिकेत जनतेने दिले ‘फस्र्ट क्लास’चे गुण- रावसाहेब दानवे

By admin | Updated: January 21, 2017 02:40 IST

चिखली येथे भाजपाचा आभार मेळावा.

चिखली , दि. २0- गेल्या दोन वर्षांत भाजपा सरकारने केलेल्या प्रगतीचे पुस्तक जनतेने तपासले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसून आला आहे. ब्रिटिशकालीन आणेवारी काढण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणल्यामुळे शेतकर्‍याला आता नुकसान भरपाई देणे सुकर झाले आहे. काँग्रेसच्या नेत्यांना भुईमुगाला शेंगा खाली येतात की वर, याचीदेखील जाण नाही, अशी काँग्रेसवर टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी येथील मेळाव्याला संबोधित केले.नगरपालिका निवडणुकांमध्ये जिल्हय़ात भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल जनतेप्रती आभार व्यक्त करण्यासह, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपा मेळावा आणि जाहीर पक्षप्रवेश सोहळय़ाचे आयोजन चिखली नगर परिषदेच्यावतीने स्थानिक राजा टॉवरच्या प्रांगणात २0 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे होते, तर प्रमुख उपस्थितांमध्ये गृहराज्यमंत्री ना. रणजित पाटील, आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय कुटे, गोविंदराव केंद्रे, नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, उपाध्यक्ष वजीराबी शे.अनिस, अँड. विजय कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना खा. दानवे म्हणाले, की राज्य व केंद्र सरकार शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत असून, दोन वर्षांत ४२00 कोटी रुपयांचे अनुदान शेतीवर खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ना. देवेंद्र फडणवीस सरकार हे विदर्भाचा सर्वच क्षेत्रातील अनुशेष भरून काढण्यास कटिबद्ध असून, रस्ते व इतर पायाभूत सुविधांबरोबरच दरडोई उत्पन्नातील पश्‍चिम महाराष्ट्र व विदर्भात असलेली तफावत दूर करण्यासह पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन आवश्यक ते पावले उचलत असून, याचे परिणाम आगामी काळात दिसून येणार असल्याचे गृहराज्यमंत्री ना.डॉ. रणजित पाटील यावेळी त्यांनी सांगितले. प्रसंगी आ.चैनसुख संचेती, आ.संजय कुटे, डॉ. प्रतापसिंग राजपूत आदींची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक युवा नेते कुणाल बोंद्रे यांनी केले. संचालन मोहन शर्मा तर आभार तालुकाध्यक्ष सुनील पोफळे यांनी मानले. यावेळी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.