खामगाव : 'वचन आमचे तुला सुनिता आम्हीही करु वेगळं काही जिद्द तुझी ती आम्हा ठरावी सतत स्फुर्तीदायी पोवाडे गं तुझ्या यशाचे गाईल भारतीय तरुणाई' या कवितेच्या ओळीं कानावर पडताच, उपस्थित बच्चे कंपनीच्या अंगावर शहारे उभे राहीले. सुनीताचा थक्क करणारा अंतराळ प्रवास बच्चे कंपनीने सलग दोन तास कुठलिही हालचाल न करता, एकाग्र चित्ताने ऐकला. निमित्त होते ते लोकमत बाल विकास मंचतर्फे आयोजित अंतराळयात्री सुनीता विल्यम्स डिजीटल शो चे. प्रा. विवेक मेहेत्रे प्रस्तुत हा कार्यक्रम स्थानिक कोल्हटकर स्मारकात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील बच्चे कंपनीला अंतराळयात्री सुनीता विल्यम्सच्या अंतराळप्रवासाचे अनेक पैलू पहायला मिळाले. सुनीताचे भारताबद्दलचे प्रेम व भारतीयत्व असल्याचा अभिमान तिने वेळोवेळी कशा प्रकारे आपल्या कामातून व्यक्त केला, याबद्दलही प्रा. मेहेत्रे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाची सुरूवात लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून धृवमार्टचे संचालक कन्हैयासेठ आयलाणी, लोकमतचे कार्यालय प्रमुख अतुल पंचवाटकर, ईव्हेंट प्रमुख प्रशांत पाटील उपस्थित होते. संचालन योगेश पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश पिंपळकार, सतिष देवगीरीकर, प्रविण राऊत, प्रफुल्ल भवर, प्राजक्ता पवार यांनी परिश्रम घेतले.
पोवाडे गं तुझ्या यशाचे गाईल तरूणाई!
By admin | Updated: July 6, 2014 23:31 IST