शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिल महिन्याच्या डाळीचा अद्यापही पत्ता नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:48 IST

जिल्ह्यातील तब्बल ७ तालुक्यांमध्ये अद्याप कोणतीही डाळ पोहोचलेली नाही.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत लाभार्थ्यांना वितरीत करण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल ७ तालुक्यांमध्ये अद्याप कोणतीही डाळ पोहोचलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात मोफत डाळ वितरणाचा तिढा सुटता-सुटत नसल्याचे चित्र असतानाच शेगाव, मलकापूर आणि खामगाव तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या तूर डाळीचा पुरवठा करण्यात आल्याचे चित्र आहे. परिणामी, शेगाव येथील तूर डाळीचा पंचनामा केल्यानंतर ही डाळ परत पाठविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत माहे एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबत प्रतिमहिना प्रती कार्ड १ किलो चना अथवा तूर दाळ मोफत वितरीत केल्या जाणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. एप्रिल महिन्यात वितरीत करण्यात येणारी डाळ मे महिन्याअखेरीस जिल्ह्यातील तब्बल ७ तालुक्यात डाळ पोहोचलेली नाही. त्याचवेळी मलकापूर, खामगाव आणि शेगाव येथे अतिशय निकृष्ट दर्जाच्या तूर डाळीचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.

 शेगाव येथून डाळ पाठविली होती परत!शेगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना वितरीत करण्यासाठी पाठविण्यात आलेली तूरडाळ ही निकृष्ट दर्जाची पाठविण्यात आली. त्यामुळे स्थानिक महसूल प्रशासन आणि पुरवठा विभागाकडून ही डाळ परत पाठविण्यात आली. मात्र, वरिष्ठ स्तरावरील दबावानंतर बुधवारी सायंकाळी पुन्हा तीच डाळ शेगाव येथे उतरविण्यात आली. शेगाव सारखीच परिस्थिती मलकापूर, मोताळा आणि खामगाव येथे असल्याचे दिसून येते.

 

तूर डाळ प्राप्त झाल्यानंतर निकृष्ट असल्याने परत पाठविण्यात आली होती. मात्र, नाफेडच्या अधिकाºयांनी ही डाळ खाण्यायोग्य असल्याचा निर्वाळा दिला. परिणामी, शेगाव तालुक्यातील वितरणासाठी ही डाळ पुन्हा उतरविण्यात आली आहे.- शिल्पा बोबडेतहसीलदार, शेगाव. 

 जिल्ह्यातील काही ठिकाणी डाळ पोहोचली आहे. मात्र, अद्यापही जवळपास ७ तालुक्यांना डाळीची प्रतीक्षा आहे. पोच झालेल्या तालुक्यांमध्ये तूर डाळ निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासंदर्भात १८ मे रोजी पुरवठा विभागाकडे तक्रारही दिली आहे.- राजेश अंबुसकरजिल्हाध्यक्ष,बुलडाणा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार, संघटना. 

टॅग्स :khamgaonखामगाव