शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीची कोंडी व अपघातामुळे जनता त्रस्त

By admin | Updated: July 17, 2014 00:42 IST

सिंदखेडराजा : रस्ता सुरक्षा नियमाचे सर्रास उल्लंघन

सिंदखेडराजा : कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवून शहरातील वाहनधारकांनीच रस्ता सुरक्षा धोक्यात आणली आहे. नियमाचे पालन होत नसल्यामुळे येथील बसस्थानकासमोर वाहतुकीची दररोज कोंडी होते, त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे.सिंदखेडराजा महामार्गाच्या दोन्ही बाजूचे वाढत असलेले अतिक्रमण, दररोज उभ्या राहणार्‍या काळ्या-पिवळ्या, ऑटो, ट्रॅक्टर, जिपगाड्या, मोटारसायकली व महामार्गावरुन सुसाट वेगाने धावणार्‍या वाहनामुळे आजपर्यंत अनेक जण दगावले आहेत. तर काहींना कायमचे अपंगत्व आले. या महामार्गावरुन प्रत्येक दिवशी १५0 ते २00 एस.टी.महामंडळाच्या गाड्या, कंटेनर, व्हाल्वोच्या मालवाहतूक गाड्या भरधाव वेगाने धावतात. विश्रामगृहा पासून पंचायत समिती, तहसील, बुलडाणा अर्बन, जिजामाता विद्यालय, भारतीय स्टेट बँक, संत भगवान बाबा कॉलेज, तालुका कृषी कार्यालय, राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालय, मराठी प्राथमिक न.प.शाळा, चिखली अर्बन बँक, बसस्थानक, सिद्धेश्‍वर प्राथमिक शाळा, रुग्णालय, कृषी तंत्र विद्यालय सह दैनंदिन कामकाजाच्या निमित्ताने याच महामार्गावरुन रहदारी करावी लागते. तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला होटेल्स व उद्योग व्यावसायीक असल्याने ग्राहकांची गर्दी वेगळीच. एक महिन्यापूर्वी झोरे पादचार्‍याचा अपघाती मृत्यू झाला. तर भास्कर हिवाळेसह तिघांना एकाच अपघातामध्ये जीव गमवावा लागला. तर वडगाव तेजन येथील दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. तर दोन शाळकरी मुले ट्रकच्या खाली मृत्युमुखी पडले. महामार्गाच्या वळण रस्त्यावर माळसावरगाव जवळ दर पंधरा दिवसाला अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत, त्यामुळे या परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी आता कायद्याचा बडगा हाती घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. स्थानिक पालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व नागरिकांनीही सकारात्मक भूमिका घेऊन वाहतुकीचे नियम पाळले तर रस्ता सुरूक्षा कायम राहू वाहतुकीची कोंडी होणार नाही, त्यामुळे यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.