शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

विवेकानंद आश्रमाच्या फिरते रुग्णालयास जनतेचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

गावोगावच्या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी, मोफत शिबिरामुळे रुग्णांच्या वेळ व पैशात बचत हिवरा आश्रम : विवेकानंद आश्रमाच्या हॉस्पिटलद्वारे गुरुवारपासून ...

गावोगावच्या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी, मोफत शिबिरामुळे रुग्णांच्या वेळ व पैशात बचत

हिवरा आश्रम : विवेकानंद आश्रमाच्या हॉस्पिटलद्वारे गुरुवारपासून डॉक्टर आपल्या गावात म्हणजेच आश्रमाचे फिरते रुग्णालय या उपक्रमाला सुरुवात झाली. कोरोना पश्चात रुग्णांची स्थिती जाणून उपचार करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, नेत्रतपासणी व इतर सर्व आजारासंबंधी संस्थेचे फिरते रुग्णालय तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकासह लोकांची मोफत आरोग्य तपासणी करीत आहे.

गुरुवारी गजरखेड या गावात झालेल्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १०० रुग्णांनी आपली विनामूल्य तपासणी करून घेतली. यावेळी सरपंच रामेश्वर सुरूशे, ग्रामसेवक संजय रिंढे यांनी रुग्णांना फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याचे आवाहन केले. शुक्रवारी लोणी या गावात सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या शिबिरात १७५ रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेचा लाभ घेतला. सरपंच अशपाक पठाण, उपसरपंच गोविंद देशमुख, मुख्याध्यापक नाटेकर, ग्रामसेवक दत्तात्रय काळे यांनी शिबिर आयोजनासाठी सहकार्य केले. ३ जुलै रोजी नांद्रा धांडे या गावात १३५ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. या फिरत्या रुग्णालयाचा जनतेला लाभ होत असून, विनामूल्य तपासणीमुळे शहरात जाण्याचा प्रवास खर्च, डॉक्टरांची फी व वेळ यात बचत होत असल्यामुळे रुग्ण समाधान व्यक्त करीत आहेत. गरजेनुसार रुग्णांचा ईसीजी, रक्त तपासणी या सुविधा सुद्धा संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पथकाचे प्रमुख डॉ. आशिष चांगाडे एम.डी. मेडिसीन व त्यांची टीम शिबिराच्या यशस्वीतेसाठी व जास्तीत जास्त रुग्णांना या मोफत सेवेचा लाभ होण्यासाठी प्रयत्नशील आहे. आज, रविवारी कल्याणा या गावात हे पथक जाणार असून, गावकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा.

शिबिराचे एक महिन्याचे नियोजन

दररोज एक गाव याप्रमाणे विवेकानंद हॉस्पिटलद्वारा एक महिन्याच्या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. अतिवृष्टी, रस्त्यांची अडचण व कोरोनाची संभाव्य भीती ही अडचण आल्यास गावातील समन्वयकास तसे कळविण्यात येईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आश्रमाच्या वतीने करण्यात आले.

प्रत्येकाला निरोगी जीवन लाभावे व प्रत्येक जीव सुखी व समाधानाने जगावा हा शुकदास महाराजांच्या शिकवणुकीचा व विचारांचा वारसा जपण्यासाठी संस्थेद्वारा सुरू असलेले फिरते रुग्णालय हा अल्पसा प्रयत्न आहे.

संतोष गोरे, सचिव विवेकानंद आश्रम