शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘लोटा’बंदीसाठी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:29 IST

बुलडाणा : बुलडाणा नगरपालिकेने दोन हजार वैयक्तिक शौचालयांचा टप्पा पूर्ण केला असून, आपल्या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत आहे. यासाठी शहरात  हगणदरीमुक्त अभियान युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. उघड्यावर शौचालयास जाणार्‍यांची पोलीस ठाण्यात वरात काढण्यात येत आहे, तर ‘लोटा’बंदीसाठी विविध प्रसार माध्यमांद्वारे  जनजागृती करण्यात येत आहे.

ठळक मुद्देदोन वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण उघड्यावर जाणार्‍यांची ठाण्यात वरात!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुलडाणा नगरपालिकेने दोन हजार वैयक्तिक शौचालयांचा टप्पा पूर्ण केला असून, आपल्या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत आहे. यासाठी शहरात  हगणदरीमुक्त अभियान युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. उघड्यावर शौचालयास जाणार्‍यांची पोलीस ठाण्यात वरात काढण्यात येत आहे, तर ‘लोटा’बंदीसाठी विविध प्रसार माध्यमांद्वारे  जनजागृती करण्यात येत आहे.शहरातील जोहरनगर, भिलवाडा, तेलगूनगर, जमाईनगर, टीव्ही रिले सेंटर परिसर जुनागाव, भीमनगर, आंबेडकरनगर, परदेसीपुरा, संभाजीनगर आदी विस्तीर्ण पट्टय़ात गल्लीबोळात वैयक्तिक शौचालयांचे खड्डेकाम, निर्माणाधिन शौचालय, बांधकाम साहित्यांचे ढीग, मिस्त्री, मजूर व घरमालकांची लगबग, पालिका कर्मचार्‍यांची देखरेख, पालिकेत पूर्ण शौचालयांचे फोटो काढून अपलोड करण्याची व अनुदान लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात येत आहे, तर  दुसरीकडे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ५.३0 वाजेपासून ते रात्री ८.३0 वाजेपर्यंत गुड मॉर्निंग पथक ‘संवेदनशील’ भागात गस्त घालत आहे.  सकाळी ५.३0 ते ८.३0 वाजता ‘गुड मॉर्निंग’ करून कर्मचारी १0 च्या ठोक्याला कार्यालयात व नंतर पुन्हा ५ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत या मोहिमेत सहभागी होत आहेत.  फिरत्या पथकांसह दोन जणांची ‘त्या’ परिसरात दोन-दोन तासांची निगराणी राहत आहे. वारंवार उघड्यावर सापडणार्‍या नागरिकांची थेट पोलीस ठाण्यात ‘वरात’ आणण्यात येऊन तंबी देण्यात येते. शौचालय नसणार्‍यांना घरकुल, बीपीएल यादी, रेशनकार्ड यामधून वगळण्याचा सज्जड इशारा देण्यात येतो. या पार्श्‍वभूमीवर आज अखेरीस शहरात ३२00 लक्ष्यांकाच्या तुलनेत दोन हजारांवर वैयक्तिक शौचालये  बांधून पूर्ण झाली असून, त्याचे फोटो अपलोड करण्यात आले. उर्वरित एक हजार शौचालये एका आठवड्यात पुर्ण होतील, अशी चिन्हे आहेत. याच जोडीला सार्वजनिक शौचालयांवरही भर देण्यात आला आहे. यापूर्वीची १0 सार्वजनिक शौचालये दुरुस्त व सुरु करण्यात आली. तसेच टाटा ग्राउंड, जुना गाव, जमाईपुरा, नवीन घरकुल परिसर, सावित्रीबाई, मिलिंदनगर, एच.पी.गॅस गोडावून, संगम तलाव, जौहर नगर, लेंडी तलाव, संभाजीनगर या परिसरात सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली. या सर्व कारवाईमुळे शहरात ‘हगणदरीमुक्त’चे वातावरण तयार झाले आहे.