शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कायमस्वरूपी शिक्षक द्या; अन्यथा शाळा बंदचा इशारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:29 IST

तालुक्यातील भरोसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आवश्यक तितके शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत असून, वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण विभागाकडून कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करणे तर दूरच, उलटपक्षी रिक्त जागांवर नवीन नेमणूक करण्यावर बंदी घालण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, हप्ताभरात नवीन शिक्षकांची नेमणूक न केल्यास बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील भरोसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आवश्यक तितके शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत असून, वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण विभागाकडून कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करणे तर दूरच, उलटपक्षी रिक्त जागांवर नवीन नेमणूक करण्यावर बंदी घालण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, हप्ताभरात नवीन शिक्षकांची नेमणूक न केल्यास बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.तालुक्यातील भरोसा हे सुमारे ३ हजार लोकवस्तीचे गाव असून, तेथे मागील ५0 वर्षांंपासून इयत्ता १ ते ७ वीपर्यंंत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा होती; मात्न इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे येथील वर्ग ५ ते ७ हे तीन वर्ग बंद पडले. दरम्यान, वर्ग बंद पडल्याची सल सहन न झाल्याने ग्रामस्थांनी एकजूट होऊन शाळा पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचा चंग बांधला आणि त्यासाठी लोकवर्गणी करून शाळा डिजिटल बनवण्यात आली. प्रत्येक वर्गात ‘एलसीडी’ लावून संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. शिवाय, परिसरामध्ये वृक्ष लागवड करून शाळेला आधुनिक टच देऊन शाळेतील वातावरण उत्साही बनविण्यात गावकर्‍यांना यश आले. तथापि, ग्रामस्थांच्या पुढाकारानेच पुन्हा बंद पडलेला पाचवा वर्ग सुरू केला होता. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता; मात्न जुलै महिन्यामध्ये गवई नामक शिक्षकेची बदली झाल्याने पाचवीतील मुलांच्या पालकांनी मुलांचे प्रवेश रद्द केले, त्यामुळे आता शाळेमध्ये चार वर्ग १३३ मुले व तीन शिक्षक अशी विचित्न परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच एका शिक्षकाकडे मुख्याध्यापक पद असल्यामुळे दोन वर्ग एकाच वर्गात बसवावे लागतात. त्यामुळे लाखो रुपये खर्चून शाळा डिजिटल करूनही पालकांचा भ्रमनिरास झाल्याने संतप्त ग्रामस्थांसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर थुट्टे यांनी ६ सप्टेंबर रोजी शिक्षण अधिकारी बुलडाणा यांना लेखी निवेदन दिले असून, आठवडाभरात कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक न झाल्यास शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. -