शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:42 IST

साखरखेर्डा : मलकापूर पांग्रा आणि शेंदुर्जन जिल्हा परिषद सर्कल मधील गारपीट ग्रस्त भागाची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड ...

साखरखेर्डा : मलकापूर पांग्रा आणि शेंदुर्जन जिल्हा परिषद सर्कल मधील गारपीट ग्रस्त भागाची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी यांनी पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी नुकसान झालेल्या रब्बीतील गहू, हरभरा,कांदा,मका,ज्वारी आदी पिकांंची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसापूर्वी मलकापूर पांंग्रा, देऊळगाव कोळ,डोरवी,पाडळी शिंदे , झोटिंगा , कंडारी , भंडारी परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान पाहून काझी यांनी

गहू, हरभरा, मका,ज्वारी आदी पिकांंसाठी हेक्टरी ५० हजार रुपये तर फळबागा, कांदा व शेड नेटसाठी हेक्टरी एक लाख रुपये तातडीची मदत द्यावी अशी त्यांनी शासनाकडे मागणी केली. सिंदखेड राजा तालुक्यात सुमारे साडेचार हजार हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मदत करावी अशी मागणी ॲड नाझेर काझी यांनी केली. यावेळी पाहणी करताना त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष शिवाजी राजे देशमुख , विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप मेहेत्रे ,पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे यांचे स्वीय सहाय्यक संभाजी पेटकर,मलकापूर पांग्राचे सरपंच भगवानराव उगले, माजी सरपंच अहमदयारखा , आदर्श कास्तकार बंडू उगले, देऊळगाव कोळ सरपंच राजू गायकवाड, संजय गायकवाड, उद्धव गायकवाड ,डोरव्ही सरपंच बाळू पवार, उपसरपंच मुरकुट, माजी सरपंच उद्धव शेळके, वसंत मुरकुट, तुकाराम पंखुले रत्नाकर पंखुले, दिनकर सोळंके, गजानन शेळके ,प्रकाश मुरकुट, अनिल मुरकुटे, गणेश मुरकुटे, अमोल साळवे आदी उपस्थित होते.