शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

होळी दहन थांबविणाऱ्या प्रशासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:35 IST

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. कारवाई ही फक्त निष्पाप नागरिकांसाठीच आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित ...

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. कारवाई ही फक्त निष्पाप नागरिकांसाठीच आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून प्रशासन व राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. शहरातली जनता चौकात दरवर्षी शेकडो वर्षांची परंपरा असलेला, हिंदू धर्मियांचा होळी सण गुण्यागोविंदाने होळी दहन करून साजरा करण्यात येतो; मात्र कोरोना संसर्गाचा वाढत्या प्रसारामुळे प्रशासनाने अंशतः लॉकडाऊनची घोषणा करून विविध सण, उत्सव साजरे करण्यावर नियम व अटींद्वारे निर्बंध लादले आहेत. कोरोना नियमांना अधीन राहूनच नागरिकांनी जनता चौकात होळी दहन करण्यासाठी सर्वतोपरी तयारी करून ठेवली होती. कुठेही गर्दी, गोंधळ न करता प्रशासनाला सहकार्य करत फक्त होलिका दहन करून कमी उपस्थितीत हा सण साजरा होणार होता; मात्र बुलडाणा शहर पोलीस प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता हिंदू धार्मियांच्या भावनांचा अनादर करत जनता चौकात सायंकाळी धाड टाकल्यागत कोणतीही पूर्व सूचना न देता, काहीही सबब एकूण न घेता होळी दहनासाठी नागरिकांनी श्रद्धाभावाने जमा केलेली लाकडे, गोवऱ्या, पूजा साहित्य जमा करून त्यांच्या गाडीत उचलून नेले व विधी उद्‌ध्वस्त करून धार्मिक भावनांचा मोठा अवमान प्रशासनाने केलेला आहे. त्यामुळे राज्यसरकार व स्थानिक प्रशासनाचा भाजपाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. कुठलीही पूर्व सूचना न देता पोलीस प्रशासनाने कारवाई करून ज्या पद्धतीने धार्मिक भावना दुखावल्या त्याप्रकरणी पोलीस प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा भाजपाच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.