शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कारासाठी २५ लाखांचा खर्च प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST

पीक कर्ज त्वरित वाटप करा सिंदखेडराजा : कोरोना काळात सगळेच हवालदिल झाले आहेत. त्यात शेतकऱ्यांची अवस्था अधिकच वाईट झाली ...

पीक कर्ज त्वरित वाटप करा

सिंदखेडराजा : कोरोना काळात सगळेच हवालदिल झाले आहेत. त्यात शेतकऱ्यांची अवस्था अधिकच वाईट झाली आहे. आता पेरणीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना त्वरित पीककर्ज वाटप करावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना बियाणे मोफत पुरवावे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ यांनी दिला आहे.

कपाशीच्या बोगस बियाणांची धास्ती

बुलडाणा : बोगस बियाणांमुळे नुकसान होण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. त्याचा फटका शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतो; परंतु कृषी विभागाकडून यावर वेळीच कारवाई केली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कपाशीच्या बोगस बियाणाची धास्ती निर्माण झाली आहे.

महाबीजचे ४० टक्केच बियाणे वाटप

बुलडाणा : अनुदान तत्त्वावरील बियाणांसाठी महाबीज महामंडळाला यावर्षी ९६३३.६० हेक्टरचा लक्षांक देण्यात आला आहे. यावर्षी अधिक पावसामुळे बहुतांश बियाणे नापास झाले. आतापर्यंत केवळ ४० टक्केच बियाणे वाटप करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील रस्त्याची दुरवस्था

जानेफळ : परिसरातील गत काही दिवसांपासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. माेठमाेठे खड्डे पडल्याने, वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.

पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

धामणगाव बढे : परिसरातील अनेक शेतरस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खरीप हंगामास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे पाणंद रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लालपरीला उत्पन्न वाढीची आशा

बुलडाणा : सोमवारपासून अनलाॅक होत असल्याने आता एसटी महामंडळाच्या लालपरीला उत्पन्न वाढीची आशा लागली आहे. बुलडाणा आगारातून सध्या २० बसगाड्या सोडण्यात येत आहेत. सोमवारपासून यात वाढ होणार आहे. बुलडाणा आगाराला गेल्या दीड महिन्यात जवळपास तीन ते चार कोटींचा तोटा झाला आहे.

बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी

सुलतानपूर : शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस पडेपर्यंत पेरणी करण्याची घाई करू नये. बियाणाला शिफारशीनुसार बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. जेणेकरून पीक जोमदार वाढीस लागेल, असे मत शेतीशाळातज्ज्ञांकडून व्यक्त केले. कृषी विभागाकडून गावोगावी खरीपपूर्व नियोजनाच्या ऑनलाइन सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात येते.

‘त्या’ पालकांना मदत देण्याची मागणी

बुलडाणा : कोरोनामुळे आई-वडील मरण पावलेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे; परंतु एकमेव अपत्य कोरोनाने मरण पावलेल्या पालकांना आधार व मदत देण्याची गरज आहे़

रेतीची अवैध वाहतूक वाढली

लोणार : तालुक्यात रेती वाहतूक करणारी काही वाहने पकडल्याने, रेती वाहतूकदारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. सध्या रेतीच्या अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. मराठवाड्यातून अनेक वाहने रेती घेऊन जिल्ह्यात येतात. अनेकांकडे परवाना नसल्याचे दिसून येते.

पदोन्नतीतील आरक्षण कायम करा

बुलडाणा : मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील रद्द केलेले आरक्षण कायम करण्याची मागणी रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.

रस्त्यांचे भाग्य केव्हा उजळणार?

देऊळगाव राजा : ग्रामीण रस्त्यांचे केव्हा भाग्य उजळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने मंजूर केलेल्या निधीतून जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचे डांबरीकरण लवकरच सुरू करणार असल्याची माहिती आहे; परंतु अद्याप ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे.

बालसंस्कार शिबिराला फटका

मेहकर : तालुक्यातील विविध बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या बालसंस्कार शिबिराला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे. शिबिराच्या माध्यमातून संस्कृत, मृदंग यासह विविध धार्मिक कार्य महत्त्वपूर्ण पद्धतीने पार पडले जातात. एक महिना बाल सुसंस्कार शिबिर राबविण्यात येते.