शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

खामगावात आणखी तीन वाढीव कोविड केअर सेंटरसाठी प्रस्ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 11:13 IST

खामगाव शहरात आणखी तीन कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना संक्रमित रूग्णांची फुगत चाललेली आकडेवारी लक्षात घेता, खामगाव शहरात आणखी तीन कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीकोनातून आता महसूल प्रशासनाने प्रयत्न चालविले आहेत.कोरोना-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. दरम्यान, खामगाव येथील कोविड केअर सेंटरवर खामगाव उपविभागातील खामगाव आणि शेगाव तालुक्यासोबतच मलकापूर उपविभागातील मलकापूर, नांदुरा शहरातील कोरोना संक्रमित रूग्ण आणि त्यांच्या हायरिक्स संपर्कातील व्यक्तींना क्वारंटीन ठेवण्यात येते. सद्यस्थितीत खामगाव येथे समाजकल्याण मुलांचे वसतीगृह, आदिवासी मुलींचे वस्तीगृह, पिंपळगाव राजा रोड, घाटपुरी हे दोनच कोविड केअर सेंटर कार्यान्वित आहेत. तथापि, रूग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता, खामगाव येथे आणखी तीन कोविड केअर सेंटर लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

वाढीव दोन सीसीसी केंद्रासाठी प्रस्ताव!जलंब रोडवरील अल्पसंख्याक मुलांचे वस्तीगृह आणि अल्पसंख्याक मुलींचे वस्तीगृह वाडी येथे नवीन दोन सीसीसी केंद्र कार्यान्वित करण्यासोबतच वाडी रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन येथेही सीसीसी केंद्र कार्यान्वित करण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत.

वाढीव सीसीसी सेंटरसाठी संभाव्य इमारतींमध्ये उपाययोजना करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यापैकी दोन वाढीव केंद्र लवकरच कार्यान्वित केले जातील. या केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्तावही पाठविण्यात आला आहे.- डॉ.शीतलकुमार रसाळतहसीलदार, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या