शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी रोखण्यासाठी १ जूनपर्यंत बियाणे विक्रीला प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 11:58 IST

Agriculture News : कृषी आयुक्तालयाने १ जूनपर्यंत बीटी बियाणांच्या विक्रीवर प्रतिबंध लावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर शिवारांमध्ये हंगामपूर्व कपाशी लागवड झाल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने १ जूनपर्यंत बीटी बियाणांच्या विक्रीवर प्रतिबंध लावला आहे. तसा आदेश ३० एप्रिल रोजी सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना दिला आहे. जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा सर्वाधिक प्रकोप खरीप २०१७ मध्ये झाला होता. यंदाच्या हंगामात गुलाबी बोंडअळीचा उपद्रव होऊ नये, यासाठी आतापासूनच उपाययोजना प्रस्तावित केल्या जात आहेत.  कपाशीची हंगामपूर्व पेरणी झाल्यास बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होणार नाही. याउलट पुनरुत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोंडअळीचा जीवनक्रम खंडित करण्याच्या प्रमुख उपायांपैकी एक प्रभावी उपाययोजना म्हणून यंदा हंगामपूर्व कपाशीची लागवड होणार नाही, याची खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना हंगामपूर्व बियाणेच उपलब्ध होऊ न दिल्यास हंगामपूर्व लागवड टाळता येऊ शकते. त्यामुळेच १ जूनपर्यंत बीटी बियाणांच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. या सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधित कंपनी, वितरक, किरकोळ विक्रेता यांच्यावर महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्य किमतीचे निश्चितीकरण यांचे विनियमन) अधिनियमात २००६ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी