शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाडळी येथील गांधी घरावरील अतिक्रमणामुळे अडचणी - राजन

By admin | Updated: July 2, 2016 00:53 IST

पत्रपरिषदेत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी संस्थेचे सचिव राजन यांनी व्यक्त केली खंत.

बुलडाणा : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणेद्वारा संचालित बुलडाणा तालुक्यातील पाडळी येथे गांधी घर स्थापन करण्यात आलेले आहे. मात्र गेल्या काही वर्षांंपासून पाडळी येथील गांधी घराच्या जागेवर एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेने अतिक्रमण केले आहे. पाडळी येथील गांधी घर अतिक्रमणाच्या भोवर्‍यात सापडल्याने विविध कामे करण्यास अडचणी येत असल्याची माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणेचे विश्‍वस्त सचिव अनवर राजन यांनी दिली आहे. स्थानिक पत्रकार भवन येथे १ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रा.बी.डी. खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना अनवर राजन म्हणाले, की महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे पुणेसह औरंगाबाद, नागपूर येथेसुद्धा मुख्य कार्यालय आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यात महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणे अंतर्गत विविध कामे करण्यासाठी पाडळी येथे गांधी घर शाखा स्थापन करण्यात आलेली आहे. परंतु पाडळी येथील गांधी घराच्या जागेवर गेल्या सहा ते सात वर्षांंपासून एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेने अतिक्रमण थाटले आहे. सदर शाळेकडे अनेक वेळा अतिक्रमण काढण्याची गांधी मार्गाने विनंती केली आहे. मात्र सदर अतिक्रमण हटविण्यास शाळा तयार नसल्याने संस्थेच्या विविध कामे करण्यास अडचणी येत आहेत. त्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रा.बी.डी. खरात म्हणाले, की महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणेच्यावतीने पाडळी येथील गांधी घर याठिकाणी ग्रंथालय, अभ्यासिका निर्माण करण्याचे नियोजन आहे. तसेच गांधीवादी विचारावर शिबिरे, महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन यासारखे उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. परंतु त्यासाठी गांधी घराच्या जागेवर झालेले अतिक्रमण अथडळा निर्माण करीत असल्याचा आरोप यांनी केला आहे. दरम्यान पाडळी येथील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष वामनराव पवार यांनी ग्राम विकास मंडळ पाडळी यांनी गांधी स्मारकासाठी पाडळी येथे जागा भेट दिली असल्याचे स्पष्ट करून ती जागा तात्पुरत्या स्वरूपासाठी शाळेकरिता व सेंट्रल बँकेला भाडे तत्त्वावर देण्यात आलेली आहे. यामध्ये कोणताही गैरप्रकार नसल्याचे स्पष्ट केले.