शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेत ऑनलाइन सभेच्या निरोपावरून सत्ताधारी-विरोधक ऑफलाइन भिडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 11:40 IST

सभेच्या निरोपावरून विरोधी नगरसेवक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच आॅफलाइन जुंपली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्थानिक नगर पालिकेची विशेष आॅनलाइन सभा गुरूवारी आयोजित करण्यात आली. मात्र, या सभेच्या निरोपावरून विरोधी नगरसेवक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच आॅफलाइन जुंपली. त्यामुळे खामगाव नगर पालिकेतील गुरूवारी चांगलेच तापले होते. यावेळी भाजप नगरसेविका चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. विरोधी सदस्यांसोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची सुध्दा यावेळी घडली.खामगाव शहराची दुसरी सुधारीत विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २१ अन्वये जाहीर इरादा प्रसिध्दीबाबत आणि नगर पालिकेतील सफाई कामगारांना शासकीय सुटीच्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला देण्यासाठी तयार केलेल्या उपविधीच्या मसुद्यास मान्यता प्रदान करण्याबाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यासंदर्भात आॅनलाइन सभा आयोजित करण्यात आली. सभेचा निरोप पालिकेतर्फे सर्वच नगरसेवकांना दिला गेला. मात्र विषय सूचीवर सभा आॅनलाइन असल्याचा उल्लेख नव्हता. सभेचा निरोप मिळाला नसल्याचे कारण पुढे करीत विरोधी सदस्य पालिका सभागृहात पोहोचत त्यांनी नगराध्यक्षांना निषेध केल्याने गोंधळ सुरू झाला. याचवेळी नगराध्यक्षांसह काही नगरसेविकाही दालनात आल्याने भाजप आणि विरोधी नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. त्यामुळे पालिकेचे वातावरण तापले होते. नगराध्यक्षा अनिता डवरे, संतोष पुरोहित, लता गरड, दुर्गा हट्टेल, राजेंद्र धनोकार उपस्थित होते. विरोधी सदस्य आॅनलाइन सभेला उपस्थित होते, मात्र, आंदोलनासाठी ते लगेच बाहेर पडले.नगराध्यक्षांच्या खुर्चीला घातला हारआॅनलाइन सभेच्या गोंधळावरून निर्माण झालेल्या वादामुळे विरोधी नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घातला. त्यामुळे पालिकेत एकच गोंधळ निर्माण झाला. विरोधी नगरसेवकांना सभागृह सोडण्यास भाग पाडले. यावेळी काँग्रेस गटनेते अमेय सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवेंद्र देशमुख, भारिपचे विजय वानखडे, सरस्वती खासने, भूषण शिंदे यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी तीव्र घोषणाबाजी केली.

विरोधाला विरोध म्हणून नव्हे, तर विरोधी सदस्यांचा जाणिवपूर्वक नेहमीच सभा असली की, गोंधळ सुरू असतो. विकास कामांना विरोध करण्याची त्यांना सवयच जडली असून, महिला नगराध्यक्षांचा त्यांच्याकडून वारंवार अवमान केल्या जातो. खूर्चीला हार घालून प्रश्न सुटनार नाही. विरोधी सदस्यांनी आपले वर्तन बदलावे.- अनिताताई डवरे, नगराध्यक्षा, खामगाव.

 

 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा