शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिगावच्या पहिल्या टप्प्यातील २२ गावांच्या पुनर्वसनाला प्राधान्य : शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:28 IST

जिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात किती गावांचे पुनर्वसन करावयाचे आहे? जिगाव महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ३३ गावांचे पूर्णत: आणि १४ गावांचे ...

जिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात किती गावांचे पुनर्वसन करावयाचे आहे?

जिगाव महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ३३ गावांचे पूर्णत: आणि १४ गावांचे अंशत: पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यासंदर्भाने पहिल्या टप्प्यात २२ गावांचे पुनर्वसन करावयाचे आहेत. २०२१ मध्ये यासंदर्भातील कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. सध्या २२ गावांमधील नागरी सुविधांची कामे सुरू आहेत.

आतापर्यंत किती गावांचे भूखंड वाटप झाले आहेत?

जिगाव प्रकल्पांतर्गत आतापर्यंत कोदरखेड, खरकुंडी आणि पलसोडा या तीन गावांचे भूखंड वाटप झालेले आहे, तर अन्य गावांत नागरी सुविधा देण्यासंदर्भातील पूर्वतयारी सुरू आहे. एकूण १८ नागरी सुविधा पुनर्वसित गावात द्याव्या लागतात.

पुनर्वसनासंदर्भातील धोरण नेमके कसे आहे?

प्रथमत: जागा निश्चितीकरण, नागरी सुविधा उपलब्ध करणे, भूखंड वाटप आणि शेवटचा टप्पा हा स्थलांतराचा असतो. यासोबतच जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, जमीन विक्री, वाटणी, बक्षीसपत्र परवानगीची कामे करण्यात येतात. कामे जलद गतीने निपटारा करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. यासोबतच या कामासंदर्भात काही अडचणी असल्यास थेट आपल्याशी संबंधितांनी संपर्क साधला तरी चालेल.

राहेरा पुनर्वसनाची स्थिती काय?

राहेरा प्रकल्प राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मूलन कार्यक्रमातंर्गतचा आहे. राहेरा पुनर्वसनाच्या दृष्टीने कामे प्रगतिपथावर आहे. नागरी सुविधांची कामे सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच भूखंड वाटपाची कामे मार्गी लागतली. ते झाल्यास राहेरा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागले. या कामालाही आम्ही प्राधान्य देत आहोत.

अन्य कोणत्या प्रकल्पांतर्गतची कामे सुरू आहेत?

जिल्ह्यातील बोरखेडी, निम्न ज्ञानगंगा, खडकपूर्णा प्रकल्पांतर्गतची पुनर्वसनाची कामे जवळपास संपुष्टात आली आहे. पेनटाकळी प्रकल्पातंर्गतच्या पुनर्वसनाच्या कामासंदर्भातही कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर नागरी सुविधांची कामे करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हा पुनर्वसन विभाग नियमित पणे आदेश घेऊन कामे मार्गी लावण्यास प्राधान्य देत आहे.