जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन २५ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खा. प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आ. डॉ. संजय रायमूलकर, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, उपवनसंरक्षक गजभिये आदी उपस्थित होते. सभागृहात आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, राजेश एकडे, जि.प. उपाध्यक्षा कमलताई बुधवत आदींसह नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. २०२०-२१ मध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाला कोविड नियंत्रणासाठी निधी देण्यात आल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात आलेल्या निधीचा उपयोग कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्यासाठी करण्यात यावा, अशा सूचना दिल्या. नगरपालिका वगळता जिल्ह्यातील घरकुलांचा डीपीआर मंजूर नाही. त्यासाठी नियुक्त केलेली एजन्सी काम करीत नाही, त्यामुळे ती बदलण्यात यावी. मेहकर नगरपालिका क्षेत्रात कामांच्या एम.बी. मेकॅनिकल इंजिनीयरने रेकॉर्ड केल्याबाबत चौकशी करण्याचे सूचित करीत नगरपालिकेच्या संदर्भातील कामांबाबत विषयसूची तयार करून नगरविकास मंत्र्यांकडे बैठक लावण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
सर्व तलावांची होणार दुरुस्ती
जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांतील अतिक्रमणे काढून टाकण्यात यावीत. याबाबतीत पुढील आठ दिवसांत कारवाई करावी. यंत्रणांनी लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची दखल घ्यावी, याबाबत योग्य ती कारवाई करून लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांचे निरसन करावे. जिल्ह्यातील सर्व तलावांचे सर्व्हे करून दुरुस्ती आवश्यक असलेल्या तलावांची कामे प्राधान्याने करण्यात यावीत. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.