शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रधान सचिव घेणार शेगावात ‘पुरवठय़ाची’ कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:39 IST

बुलडाणा: गेल्या काही काळापासून रेशनच्या धान्याचा वाढता  काळाबाजार रोखण्यासोबतच बुलडाणा जिल्हय़ातील स्वस्त  धान्य वितरण यंत्रणेला व्यवस्थेमध्ये झालेल्या बदलाबाबत  सूचित करण्यासोबतच ई-पॉज मशीन फ्रेंडली हाताळण्याबाबतचे  महत्त्वपूर्ण प्रशिक्षण शेगाव येथे २६ ऑक्टोबर रोजी देण्यात  येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यशाळेसाठी अन्न व नागरी  पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक हे स्वत: हजर  राहून जिल्हय़ातील एकंदरीत स्थितीचा आढावा घेणार आहे.

ठळक मुद्देरेशन दुकानदारांना देणार प्रशिक्षण गिरीश बापट यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या काही काळापासून रेशनच्या धान्याचा वाढता  काळाबाजार रोखण्यासोबतच बुलडाणा जिल्हय़ातील स्वस्त  धान्य वितरण यंत्रणेला व्यवस्थेमध्ये झालेल्या बदलाबाबत  सूचित करण्यासोबतच ई-पॉज मशीन फ्रेंडली हाताळण्याबाबतचे  महत्त्वपूर्ण प्रशिक्षण शेगाव येथे २६ ऑक्टोबर रोजी देण्यात  येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यशाळेसाठी अन्न व नागरी  पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक हे स्वत: हजर  राहून जिल्हय़ातील एकंदरीत स्थितीचा आढावा घेणार आहे.अन्न व नागरी पुरवठा विभागातील कामकाजासोबतच धान्य वि तरण प्रणालीमध्ये पारदर्शकता निर्माण करण्याच्या दृष्टीने या  विभागाचे डिजिटलायजेशन करण्यात आले आहे. बुलडाणा  जिल्हय़ातील एक हजार ५६७ दुकानामध्ये ई-पॉज मशीन  लावण्यात आल्या असल्या तरी त्या योग्य पद्धतीने हाताळल्या  जात नसल्याची ओरड आहे. त्यातच गेल्या काही काळात  जिल्हय़ात स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्य़ा बाजारात  विक्रीस जात असल्याच्या काही घटना उघडकीस आल्या हो त्या. खामगाव, चिखली, लव्हाळासह जिल्हय़ातील काही  ठिकाणी रेशनचे काळ्य़ा बाजारात जाणारे धान्य जप्त करण्यात  आले होते. पुरवठा विभागातील कर्मचार्‍यांनी प्रशासकीय पा तळीवरील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करीत गेल्या  आठवड्यात आंदोलन केले होते. या पृष्ठभूमीवर गुरुवारी  शेगावमध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश  पाठक यांच्या उपस्थितीमध्ये ही कार्यशाळा होत असल्याने याला  महत्त्व आले आहे. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज  अभियांत्रिकी महाविद्यालयात ही कार्यशाळा होत असून, अन्न व  नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापटही या कार्यशाळेत आवर्जून उ पस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले; मात्र अद्याप त्या  संदर्भात त्यांचा अधिकृत दौरा स्पष्ट झालेला नाही.क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील मोठय़ा जिल्हय़ांपैकी एक  असलेल्या आणि तब्बल १३ तालुके असलेल्या बुलडाणा  जिल्हय़ातील रेशननिंग व्यवस्थेत अधिक पारदर्शकता  आणण्यासोबतच नवीन कायदे व डिजिटल यंत्रणा कशी हा ताळावी या दृष्टीने या कार्यशाळेत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात  येणार आहे. नाही म्हणायला बुलडाणा जिल्हय़ात तब्बल १७  लाख नागरिकांना रेशनिंगद्वारे धान्य पुरवठा केला जातो. या  कार्यशाळेस जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह  पुरवठा विभागाचे बहुतांश कर्मचारी उपस्थित राहणार असल्याचे  सूत्रांनी स्पष्ट केले. सोबतच जिल्हय़ातील रेशन दुकानदारही या  कार्यशाळेत मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत.

दुकानदारांना दिलासागेल्या महिन्यात रेशन दुकानदारांचे माजिर्न वाढविण्यात आले  असून, प्रती क्विंटल ते दीडशे रुपये करण्यात आले आहे.  त्यामुळे दुकानदारांचीही गेल्या प्रदीर्घ कालावधीपासून असलेली  माजिर्न वाढविण्याची मागणी पूर्णत्वास गेली आहे.