शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना : गरोदर मातांना बँक खाते उघडण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:28 IST

नांदुरा : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या लाभासाठी गरोदर मातांना  बँक खाते उघडण्यात अडचणी येत आहेत. 

संदीप गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या लाभासाठी गरोदर मातांना  बँक खाते उघडण्यात अडचणी येत आहेत. महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे व जन्माला आलेले बाळही सुरक्षित असावे याकरिता विविध आरोग्य तपासण्यांसह लसीकरण आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असले तरी ग्रामीण भागात बर्‍याच स्त्रिया गरीबीमुळे आरोग्याकडे व मातृत्वाकडेही गंभीरतेने लक्ष देत नाहीत. त्यामुळे प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु करण्यात आली असून याद्वारे पाच हजार रुपयांचा लाभ विविध टप्प्यात मातांना देण्यात येतो. परंतु काही ठिकाणी बँक खात्यांच्या अडचणींमुळे मात्र या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.भारतात कुपोषणामुळे स्त्रीयांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने तसेच तीन स्त्रियांमधील एक स्त्री कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्त्रियांची जन्मलेली बालकेही कमी वजनाची व कुपोषित असतात. कुपोषण हे मातेच्या गर्भामध्येच सुरु होत असल्याने याचा परिणाम बालकाच्या जीवनचक्रावर होतो. आर्थिक अडचणींमुळे अनेक स्त्रिया अगदी गरोदरपणापर्यंत काम करीत असतात. तसेच बाळाच्या जन्मानंतरही लवकरच कामास सुरुवात करतात. त्यामुळे बाळाच्या स्तनपानावरही परिणाम होतो. यासर्व बाबींच्या अनुषंगाने केंद्र शासनाने १ जानेवारी २0१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत गरोदर मातांना तीन टप्प्यात रुपये पाच हजाराचा लाभ बँकेच्या किंवा पोष्टाच्या खात्यामार्फत देण्यात येतो. नांदुरा तालुक्यातील काही बँकांमध्ये गरोदर मातांना बँक खाते उघडण्यासाठी पॅनकार्डची मागणी करण्यात येत असल्याने खाते उघडण्यास अडचणी येत आहे. बँक खाते नसल्यास पोष्ट ऑफीसचेही खाते प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी चालत असल्याने गरोदर मतांनी केवळ बँकेच्याच भरवश्यावर न राहता पोष्ट ऑफीसमध्येही खाते सुरु केल्यास योजनेचा लाभ मिळू शकतो अशी अपेक्षा गरोदर मातांनी व्यक्त केली आहे. 

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे पाच हजार व जननी सुरक्षा योजनेचे एक हजार असा लाभ मिळण्यासाठी गरोदर मातांचे राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोष्ट ऑफीसमध्ये खाते असणे आवश्यक आहे. सदर खाते क्रमांक व गरोदरपणाच्या नोंदीचे आरोग्य विभागाचे कार्ड, मोबाईल क्रमांक, विहित नमून्यातील फॉर्म, गरोदर मातेच्या व तिच्या पतीच्या सहीने सादर करावा लागतो. परंतु बर्‍याच गरोदर मातांचे बँक खाते नसल्याने त्यांना योजनेच्या लाभासाठी अडचणी येत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा