शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळीचे भाव घटले; परवानाधारक त्रस्त!

By admin | Updated: September 1, 2016 02:34 IST

डाळ खरेदीस स्वस्त धान्य दुकानदार नकार दर्शवत आहेत.

विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. ३१: जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने स्वस्त धान्य दुकानांतर्गत लाभार्थींना वाटप करण्याकरिता दोन कोटी रुपयांची तूर डाळ खरेदी करण्यात आली. मात्र, अचानक तूर डाळीचे भाव बाजारात पडल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार सदर डाळ खरेदी करण्यास नकार देत आहेत.जिल्ह्यात जवळपास १४३६ स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानांतर्गत अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना तूर डाळीचे वाटप करण्यात येते. या लाभार्थींंना तूर डाळीचे वाटप करण्याकरिता जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने १0३ रुपये प्र ितकिलो दराने दोन कोटी रुपयांच्या तूर डाळीची खरेदी करण्यात आली. ही तूर डाळ लाभार्थींना वाटण्यात येणार आहे. मात्र, बाजारात तुरीच्या डाळीचे भाव ८0 रुपयांपासून तर ९५ रुपयांपर्यंंत आहेत. त्यामुळे ग्राहक स्वस्त धान्य दुकाना तून तूर डाळ खरेदी करण्याऐवजी बाजारातून खरेदी करेल. परिणामी स्वस्त धान्य दुकानातील डाळीची खरेदी होणार नाही. नेहमीप्रमाणे जिल्हा पुरवठा विभागातील तूर डाळ स्वस्त धान्य दुकानदारांनी खरेदी केली, तर त्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार ही तूर डाळ खरेदी करण्यास नकार देत आहे. मात्र, आगामी दिवसांमध्ये पोळा, गणेश उत्सव, गौरी पूजन, नवदुर्गा उत्सव असल्यामुळे प्रत्येक लाभार्थीला शिधापत्रिकेवर एक किलो तूर डाळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना डाळ खरेदी करावीच लागणार आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. सणांसाठी साखरेसह धान्यसाठा मुबलक उपलब्ध आगामी महिनाभर सण, उत्सव असल्यामुळे साखरेसह अन्य धान्यसाठा स्वस्त धान्य दुकानांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे.