शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मध्यावधीसाठी तयार - सुप्रिया सुळे

By admin | Updated: June 20, 2017 04:31 IST

आम्हीही निवडणुकीसाठी चोवीस तास तयार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोणताही पक्ष हा निवडणुकीसाठी केव्हाही तयार असतो. आम्हीही निवडणुकीसाठी चोवीस तास तयार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांना खा. सुप्रिया सुळे यांच्यावतीने मदत करण्यात येते. सध्या मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात येत आहे. आता विदर्भातील शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांनाही मदत करण्यात येणार असून, याची सुरुवात बुलडाण्यातून झाली आहे. जिल्हय़ातील आत्महत्याग्रस्त विधवांची मदत देण्यासाठी निवड करण्याकरिता खा. सुप्रिया सुळे बुलडाण्यात आल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, की जिल्हय़ातील २५ आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांची निवड करून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्याकरिता मदत करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्चही आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती. त्यामध्ये कोणत्याही अटी नकोत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. रुईखेड मायंबा येथे एका महिलेवर अत्याचार झाला असून, ही पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी घटना असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेकडे जातीपातीच्या दृष्टीने न पाहता केवळ एका महिलेवर अन्याय झाला आहे, त्यामुळे आपण सर्वांंनी याचा निषेध करायला हवा, असेही त्या म्हणाल्या. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीसाठी तयार आहे काय, असे विचारले असता सुळे म्हणाल्या की कोणताही पक्ष हा निवडणुकीसाठी नेहमीच तयार असतो. देशात लोकसभेच्या निवडणुका केव्हा होतील, हे सांगता येईल; मात्र विधानसभेच्या निवडणुका केव्हा, हे सांगता येणार नसल्याचे सांगत मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असे सूचक विधान त्यांनी केले.