शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा अर्बन गणेशोत्सव मंडळाची तयारी पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:31 IST

बुलडाणा : येथील बुलडाणा अर्बन गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या यावर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. 

ठळक मुद्देआयडॉल स्पर्धा ठरणार आकर्षणम्यानमार येथील मंदिराची प्रतिकृती राहणार गणेशभक्तांचे आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील बुलडाणा अर्बन गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या यावर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षी म्यानमार (ब्रम्हदेश) येथील मंदिराची  प्रतिकृती गणेशभक्तांचे आकर्षण राहणार आहे. याशिवाय बुलडाणा अर्बन गणेश मंडळातर्फे पश्‍चिम विदर्भ, जळगाव खान्देश आणि औरंगाबाद जिल्हय़ातील गायिका-गायकांसाठी आयोजित केलेली बुलडाणा आयडॉल स्पर्धा समस्त कला रसिकांसाठी आकर्षण ठरणार आहे. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे यंदा १६ वर्षे असून, दरवर्षी मंडळाच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांना आजपर्यंत कलारसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावर्षीदेखील १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २0१७ या कालावधीत गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळाची तयारी पूर्ण झाली आहे.गणेशोत्सव मंडळाच्यावतीने २५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वा. बुलडाणा अर्बन मुख्यालय आवारात उभारण्यात आलेल्या मंडपात o्री गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. २६ ऑगस्ट रोजी संस्थेच्या कर्मचार्‍यांच्या विविध स्पर्धा होणार आहेत. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता अथर्वशीर्ष पठण, उपासना होणार आहे, तर २ सप्टेंबर रोजी राजुरघाट येथे संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वृक्षारोपण करणार आहेत. ३ सप्टेंबर रोजी बुलडाणा आयडॉल स्पर्धेची उपांत्य फेरी आणि ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात बुलडाणा आयडॉल स्पर्धेची महा अंतिम फेरी आयोजित करण्यात आली आहे. ६ सप्टेंबर रोजी आनंद मेळावा होणार आहे. याबाबतचे विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाइी बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत असून, विविध समितीच्या माध्यमातून आपले कार्य पार पाडत आहेत. बुलडाणा अर्बन गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित आयडॉल स्पर्धेचा गणेशभक्त व कलारसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गणेशोत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो.