शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

दुग्धोत्पादकांना प्राधान्याने पतपुरवठा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

बुलडाणा : गेल्यावर्षी केंद्राने कृषी क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील दुग्धोत्पादकांना पशूंच्या संगोपनासाठी प्रती जनावर २० हजार ...

बुलडाणा : गेल्यावर्षी केंद्राने कृषी क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील दुग्धोत्पादकांना पशूंच्या संगोपनासाठी प्रती जनावर २० हजार रुपयांप्रमाणे महत्तम पातळीवर तीन लाख रुपयांपर्यंत पतपुरवठा करण्याच्या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजाणी झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना बँकांनी प्राधान्याने पतपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यासंदर्भात जिल्हा दूध संघ, बँकर्स समितीचे अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. त्यात उपरोक्त निर्देश देण्यात आले. या बैठकीस अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा दूध संघाचे समाधान शिंगणे, संचालक रमेश पाटील, सहायक निबंधक रमेश भोयर (पदुम), जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे सीईओ डॉ. अशोक खरात यांच्यासह अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्राने गेल्या वर्षी मे महिन्यात कृषी क्षेत्रासाठी एक लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. त्याअंतर्गत पशुपालन, मत्स्य व्यवसायासाठी १५ हजार कोटींची घोषणा केली होती. त्याअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील पशुपालनासाठी प्रती जनावर २० हजार रुपये प्रमाणे वित्तपुरवठा किसान क्रेडिट कार्डअंतर्गत करण्यात येणार होता. कमाल १५ गुरांसाठी तीन लाख रुपयांपर्यंतचा हा पतपुरवठा करण्याची मर्यादा होती; पण प्रत्यक्षात यासाठी बँकांकडे गेलेल्या प्रकरणांमध्ये अत्यल्प प्रमाणात पतपुरवठा झाला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा दूध संघाच्या मार्फत दुग्धोत्पादन करणाऱ्या पशुपालकांना प्राधान्याने पतपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. हा मुद्दा घेऊन २९ मे रोजी अनुषंगिक बैठक घेण्यात आली होती. त्यामुळे दुग्धोत्पादकांना प्राधान्याने पतपुरवठा करण्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी निर्देशित केले आहे. दरम्यान यापूर्वीच्या पतपुरवठ्याच्या परतफेडीसंदर्भातील अडचणीही यावेळी त्यांनी जाणून घेतल्या. जिल्हा दूध संघांतर्गत एकूण १५०० दूध उत्पादक शेतकरी सभासद आहेत.

--१,६०,००० पर्यंत विना तारण कर्ज--

दुग्धोत्पादकांसाठी १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत विना तारण पतपुरवठा करण्याचे धोरण आहे. सोबतच योजनेंतर्गतच्या अटी, शर्थीचे पालन करून ५ टक्के व्याज परताव्यावर हा पतपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील या बैठकीनंतर आता बँकांकडून कितपत पतपुरवठा दुधाळ जनावरांच्या संगोपनासाठी मिळेल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

--जिल्ह्यातील दुधाळ जनावरे--

शेळ्या:- ३,६४,६८९

मेंढ्या:- १,२५,२८०

गाय:- १,९८,८९१

म्हैस:- १,३४,१४८

--दहा हजार लिटर दुधाचे संकलन--

जिल्हा दूध संघ आणि खासगी संघाच्या माध्यमातून जिल्ह्यांतर्गत दहा हजार ८६४ लिटर दुधाचे संकलन होते. मात्र, परजिल्ह्यातील खासगी दूध संकलन करणाऱ्यांकडून २४ हजार लिटर दुधाचे जिल्ह्यात संकलन होते.