शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

‘पीआरसी’ने घेतली झाडाझडती

By admin | Updated: January 20, 2016 01:57 IST

बुलडाणा जिल्हा पाहणी दरम्यान दे.राजा पंचायत समितीअंतगर्त सिंचन व बाल विकास प्रकल्पाचा घेतला अहवाल.

बुलडाणा : पंचायत राज समिती सदस्य आमदारांच्या पाच चमूंनी मंगळवारी जिल्हा पाहणी केली. पीआरसी येणार म्हणून प्रतीक्षेत असलेल्या शाळा, आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतींमधील कर्मचार्‍यांनी पीआरसी येताच प्रचंड भीतीच्या दडपणाखाली सदस्यांचे स्वागत केले, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली व तद्नंतर सदस्यांनी अनेक ठिकाणी झाडाझडती घेतली तर कुठे समाधान व्यक्त केल्याने कर्मचार्‍यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला.देऊळगावराजा येथील दोन विभागांना संपूर्ण दप्तर घेऊन बुलडाण्यात येण्याचे आदेश दिल्याने या विभागाचे धाबे दणाणले आहे.बुलडाणा जिल्ह्यात पंचायत राज समितीने मंगळवारी पाहणी करून शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत अशा संस्थांची पाहणी केली. या पाहणीत जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथील शाळेत शालेय पोषण आहाराची चव सदस्यांनी घेतली तर मनसगाव येथे आरोग्य केंद्राची झाडाझडती घेतली. बुलडाणा पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागातील कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.पीआरसी पथकाला सिंचन विभाग व एकात्मिक बालविकास केंद्र यांनी सादर केलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळल्याने पीआरसीने दोन्ही विभागाच्या प्रमुखांना बुधवारी बुलडाणा येथे हजर होण्याचे आदेश दिले आहेत. आ.भरतसेठ गोगावले यांच्या नेतृत्वातील सदस्यांनी एकात्मिक बाल विकास सेवा विभागाकडे पूरक पोषण आहारासाठी पात्र मुले किती? ३00 दिवस किती मुलांना आहार वाटप झाला, बंद पडलेल्या काळात पर्यायी व्यवस्था काय केली, २0१0 ते ११ मध्ये किती लाभार्थी होते, प्रकल्पनिहाय किती मुलांना गंभीर स्वरुपाचे आजार होते, आजार असलेल्या व तपासणी केलेल्या मुलांची संख्या किती, त्यापैकी किती जणांना सेवा दिली, तालुक्यातील कुपोषित बालकांची संख्या किती आहे, याबाबत प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी केवट यांच्याकडे विचारणा केली असता, या प्रश्नांची सर्मपक उत्तरे त्यांनाही देता आली नसल्याची माहिती आहे. प्रश्नतालिकेतील प्रश्न क्र.२५ सिंचन विभागाशी संबंधित होता. पंचायत राज समितीमध्ये आतापर्यंत मंजूर झालेली लघू पाटबंधारे स्थानिक क्षेत्र विकासांची कामे किती, हा प्रश्न गाजला. तालुक्यातील गोळेगाव येथील शेततलावासह इतरही दोन ते तीन गावांच्या शेततलावासंदर्भात समिती सदस्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी केवट व सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता यांना बुधवारी तातडीने अहवाल घेऊन बुलडाणा येथे हजर राहण्याचे आदेश पीआरसीने दिले असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. या पथकाने पंचायत समिती लेखा विभाग, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्राम समितीने मागविलेल्या निविदा, प्रलंबित प्रकरणे, मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना, जवाहर रोजगार योजनेची कामे आदी कामांचा आढावा घेतला. यावेळी बीडीओ ज्ञानोबा मोकाटे, पं.स.सभापती अनिता झोटे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी सहभागृहात हजर होते.