शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव व बुलडाण्यात गुरूद्वारांमध्ये होणार प्रार्थना

By admin | Updated: November 5, 2014 23:53 IST

दिनविशेष : गुरू नानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

नाना हिवराळे /खामगाव (बुलडाणा)जिल्ह्यातील सर्वांत मोठा गुरुद्वारा खामगाव शहरात आहे. सन १९४५ साली शहरातील शीख समाजाचे अध्यक्ष मनमोहनसिंग शीख यांच्या पुढाकाराने गुरुद्वाराची स्थापना करण्यात आली. सर्वधर्म समभावाचा संदेश मानवजातीला देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या सेवा, सिमरन, एकता व बंधुत्व या शिकवणीचा अंगीकार समाजबांधवांकडून होत आहे. गरीब, कष्टकरी, भुकेल्यांना अन्नदान समाजबांधवांकडून करण्यात येते. खामगाव शहरात एक हजाराच्या जवळपास शीख बांधवांची संख्या आहे. खामगाव शहराबरोबरच जिल्ह्यात समाज विस्तारला आहे. दरवर्षी गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वारा श्री गुरुसिंघ सभा, खामगाव यांच्या वतीने लोकोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. जयंती पर्वावर प्रभात फेरी, कथा, कीर्तन तसेच ह्यगुरू ग्रंथसाहिबह्ण या धर्मग्रंथाचे वाचन केले जाते.देवाला हृदयात ठेवा, प्रामाणिकपणे जगा, भरपूर कष्ट करा, सर्वांशी समान वागा, मानवजा तीसोबत प्राण्यांची सेवा करा, दैवावर जास्त विश्‍वास ठेवू नका अशा प्रकारची शीख धर्माची शिकवण जयंती निमित्ताने दिली जाते. *बुलडाण्यात २१ वर्षांची अखंडित परंपरा बुलडाणा : येथील गुरू नानक सेवा समितीतर्फे यावर्षी गुरू नानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधवांतर्फे २१ वर्षांपासून सुरू असलेलेली परंपरा आजही जोपासण्यात येत आहे. बुलडाणा शहर जिल्ह्याचे ठिकाण असले तरी शिख, पंजाबी व सिंधी बांधवांचे जवळपास १५0 कुटुंब आहेत, तर लोकसंख्या जवळपास ८00 आहे. वर्षभर आपल्या विविध व्यवसायात मग्न असलेले शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधव गुरू नानक जयंतीनिमित्त एकत्र येतात. यावर्षीही तिन्ही समाजबांधवांनी एकत्र येऊन गुरू नानक जयंती उत्साहात साजरी करण्याचे नियोजन केले आहे.