शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

प्रकाश बस्सी यांचे पं.स. सदस्यत्व रद्द; जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे भोवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:37 IST

 लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : पंचायत समितीमधील काँग्रेसचे प्रकाश बस्सी यांचे पंचायत समिती सदस्यत्व जिल्हाधिकारी  यांनी एका आदेशान्वये रद्द केले आहे. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वतरुळात एकच खळबळ उडाली आहे.फेब्रुवारी २0१७ मध्ये झालेल्या जि.प. व पं.स.च्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रकाश ...

ठळक मुद्देमोताळा पंचायत समिती

 

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : पंचायत समितीमधील काँग्रेसचे प्रकाश बस्सी यांचे पंचायत समिती सदस्यत्व जिल्हाधिकारी  यांनी एका आदेशान्वये रद्द केले आहे. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वतरुळात एकच खळबळ उडाली आहे.फेब्रुवारी २0१७ मध्ये झालेल्या जि.प. व पं.स.च्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रकाश बस्सी यांनी बोराखेडी पंचायत समिती गणातून अनुसूचित जमाती या राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवत जिंकली होती.  राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या ४ ऑगस्ट २0१६ च्या शासन निर्णयानुसार व जि.प. व पं.स. अधिनियम १९६१ च्या कलम १२ (अ), ४३ (६),(अ),६७ (७-अ) नुसार राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्यांनी सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्या व्यक्तीची निवड रद्द करण्यात यावी, अशी तरतूद आहे. प्रकाश गण्यानसिंग बस्सी यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर केलेले नाही, असा अहवाल मोताळा तहसीलदारांनी २५ जानेवारी रोजी वरिष्ठांना सादर केला होता. यावरून जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत प्रकाश बस्सी यांची पं. स. सदस्य म्हणून झालेली निवड रद्द केल्याचा आदेश पारित केला आहे.

ठोके यांचेही सदस्यत्व रद्दसिंदखेडराजा : येथील पंचायत समिती सदस्य राजेश ठोके यांचेही सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी २९ जानेवारी रोजी काढलेल्या एका आदेशान्वये रद्द केले आहे.राजेश o्रीपत ठोके हे सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये सवडद गणामधून राखीव प्रवर्गातून निवडून आले होते; मात्र त्यांनी निर्धारित सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांचे पंचायत समिती सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी रद्द केले आहे. जिल्ह्यातील जवळपास चार सदस्यांचे सदस्यत्व या कारणामुळे रद्द झाले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतbuldhanaबुलडाणा