शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

जनता दरबारात कडाडले ऊर्जामंत्री

By admin | Updated: April 26, 2017 00:49 IST

एका अभियंत्याच्या निलंबनाचा प्रस्ताव, आठ अभियंत्यांची वेतनवाढ रोखली!

बुलडाणा: वीज समस्यांवर बोलाविलेल्या जनता दरबारात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच कडाडले असून, शेतकऱ्यांना वीज जोडणी न देण्यासह कामात हलगर्जीपणा करणाऱ्या एका अभियंत्याला निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला, तर आठ अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्यात आली. राज्याचे ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २५ एप्रिल रोजी महावितरण व महापारेषणच्या पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण व मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन केले; तसेच यानंतर ग्राहकांच्या समस्या ऐकून घेण्याकरिता जनता दरबार भरविण्यात आला. यावेळी मंचावर आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. आकाश फुंडकर, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, आ. संजय रायमुलकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, भाजपचे बुलडाणा विधानसभा अध्यक्ष योगेंद्र गोडे, जिल्हा परिषद सभापती श्वेता महाले, महावितरणचे क्षेत्रीय संचालक प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांची उपस्थिती होती. यावेळी ऊर्जामंत्र्यांनी ग्राहकांच्या समस्या ऐकून घेत त्यावर तत्काळ संबंधित अभियंत्यांना जाब विचारण्यात आला. यादरम्यान २०१३ मध्ये अर्ज केलेले शेतकरी अभिमन्यू लहाने यांना शेतातील कृषी पंपाची वीज जोडणी न देणाऱ्या उपअभियंता चव्हाण यांच्या तीन वेतनवाढ रोखण्याचा आदेश यावेळी देण्यात आला. बुलडाणा शहरातील एका घरावरून वीज वाहिनी गेली आहे. यामुळे अपघातग्रस्त झालेल्या घरमालकाची साधी पाहणीही न करता त्याला कोणताही मोबदला देण्यात आला नाही, त्यामुळे बुलडाण्याचे कार्यकारी अभियंता विजय जिजीलवार यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले; तसेच लोणारचे उपअभियंता खोकडे मुख्यालयी राहत नसल्याचे आ. संजय रायमुलकर यांनी सांगितले. त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी खोडके यांना कुठे राहता, कुणाच्या घरात राहता, घरमालकाचा मोबाइल नंबर काय? याबाबत विचारपूस केली असता, खोडके यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. परिणामी, त्यांच्या तीन वेतनवाढी रोखण्यात आल्या. तसेच राजेश मिश्रा, दीपक पाटील यांसह सहा अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्यात आली. शेतकरी व ग्राहकांनी दिलखुलास आपल्या तक्रारी मांडल्या. त्यावर ऊर्जामंत्र्यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. ऊर्जामंत्री अधिकाऱ्यांचे नाव घेताच त्यांची दाणादाण उडत होती. शेतकरी किंवा ग्राहकांशी उद्धट वागणारे अधिकारी ऊर्जामंत्र्यांपुढे उत्तरे देताना त-त, प-प करीत होते. अधीक्षक अभियंता कडाळे यांचीही घाबरगुंडी उडाली होती. कडाळे यांनाही बुलडाणा जिल्ह्यातील महावितरणचे ढेपाळलेले काम त्वरित सुधारले नाही, तर कारवाई करण्याचा इशारा दिला. कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई होत असल्याचे पाहत उपस्थित वीज ग्राहकांमध्येही उत्साह संचारला होता. टाळ्यांच्या कडकडाटात ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या निर्णयांना दाद मिळत होती. यासोबतच या कार्यक्रमांतर्गत अनेक वीज ग्राहकांच्या तक्रारी, निवेदने व सूचना स्वीकारून त्याचे निराकरण याच कार्यक्रमात करण्यात आले. ‘अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, रोजगार हमी’ - ऊर्जामंत्रीग्राहकांना चुकीची बिले जातात, घरात कमी विजेचा वापर झाल्यावरही अधिक रकमेचे बिल येतात. अशा प्रकारची तक्रार ग्राहकांनी केल्यावर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. त्यावर बिल वाटप करणाऱ्या संबंधित एजन्सीची चौकशी करून सांगतो, असे उत्तर मिळाले. या उत्तरावर संतप्त होत ऊर्जामंत्र्यांनी एजन्सीची मान्यता रद्द करण्याचा आदेश दिला; तसेच आतापर्यंत का कारवाई केली नाही, याचा जाब विचारत अर्धे तुम्ही आणि रोजगार हमी असा प्रकार सुरू असल्याचे म्हणत ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.