शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला पिकांवर ‘पावडरी मिल्ड्यू’ रोगाचे थैमान; भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात

By विवेक चांदुरकर | Updated: February 3, 2024 19:05 IST

सध्या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला पिकावर ‘पावडरी मिल्ड्यू’ भूरी रोगाचा प्रादुर्भााव झाला आहे.

खामगाव: सध्या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला पिकावर ‘पावडरी मिल्ड्यू’ भूरी रोगाचा प्रादुर्भााव झाला आहे. या रोगामुळे पानगळ होत असून, लाखो रूपये खर्चून पेरणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. खामगाव तालुक्यात रब्बी हंगामात ३३ हजार ८४८ हक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कांद्याची ३६८३ तर भाजीपाल्याची ११२६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. रात्री उच्च सापेक्ष आद्रता व दिवसा कमी सापेक्ष आद्रता तसेच २२ ते ३० डिग्री सेल्सीअस तापमान असे पाेषक वातावरण असल्याने या रोगाचा प्रसार वाढला आहे. यामुळे झाडांची पानगळ होत आहे. झाडांची संपूर्ण पाने गळून पडत असून, झाडे सुकत आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शेतकरी फवारणी करीत आहेत. मात्र, फवारणी केल्यावरही पानगळ सुरूच आहे. रोगाची लक्षणेया रोगाचा प्रादुर्भाव झाला तर मिरचीच्या पानांच्या वरच्या बाजुस पिवळसर डाग पडतात. रोगाच्या नंतरच्या काळात पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी पांढरी बुरशी वाढते व नंतर पृष्ठभागावर पसरल्यामुळे प्रकाश संष्लेशन क्रियेमध्ये अडथळा निर्माण होवून पाने व फुले गळून पडतात.  पिकांवर सध्या भूरी रोग आला आहे. या रोगामुळे पानगळ होत आहे. फवारणी केल्यावरही झाडांची पाने गळून पडत आहे. शेंड्यापर्यंत झाडांची पाने गळून पडत असून केवळ खोडच शिल्लक राहत आहे. त्यामुळे झाड सुकत आहे. - दीपक हागे, शेतकरी, वानखेड झाडांचे नियमित निरिक्षण केल्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव निदर्शनास आल्यावर सल्फर ८० टक्के डब्ल्यू पी २५ ग्रॅम किंवा अझोक्सा ट्रोबिन २३ एस. सी. अधिक १० मिली अॅमीटर, संयुक्त बुरशीनाशके जसे झोक्सास्ट्रोबिन ११ टक्के अधिक टेबूकोनाझोटल १८.३ टक्के एस बी किंवा १० मिली टेब्यूकोनाझोल १८.३ टक्के अधिक सल्फर ६५ टक्के डब्ल्यूजी २५ ग्रॅम याची फवारणी करावी. - अनिल तु. गाभणे, पीक संरक्षण तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद

टॅग्स :buldhanaबुलडाणा