शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट ऑफिसमध्ये दीड कोटींच्यावर ठेव जमा!

By admin | Updated: November 18, 2016 02:41 IST

१ कोटी ६६ लाख ८0 हजार रुपये झाले जमा.

खामगाव, दि. १७- एक हजार आणि पाचशेच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्यानंतर शहरासह राज्यातील पोस्ट ऑफिसमध्ये रक्कम ठेव म्हणून जमा करण्याचा ओघ कमालीचा वाढला आहे. दरम्यान, पतीराजांपासून लपविलेल्या लक्षावधी रुपयांचाही बचत आणि आवर्ती ठेव म्हणून जमा करण्याचा प्रयत्न महिला वर्गाकडून गेल्या जात आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांमध्ये खामगाव पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल १ कोटी ६६ लाख ८0 हजार ९0८ रुपयांची ठेव जमा झाली आहे.काळा पैसा बाहेर काढण्यासाठी तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ नोव्हेंबरपासून ५00 व १000 रुपयाच्या नोटा बंदचा निर्णय जाहीर केला. या नोटा ३0 डिसेंबरपर्यंंत पोस्टात किंवा बँकेत जमा कराव्या लागणार आहेत. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेच शहरातील एटीएमवर पैसे काढण्यासाठी, काहींनी भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. १0 नोव्हेंबरपासून नागरिकांचा राज्यातील विविध पोस्ट ऑफिसमध्ये रक्कम ठेव म्हणून जमा करण्यासाठी ओघ सुरू झाला. खामगाव येथील पोस्ट ऑफिसमध्ये १६ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंंंत तब्बल १ कोटी ६६ लाख ८0 हजार ९0८ रुपयांची बचत आणि आवर्ती ठेव जमा झाली आहे. ठेव जमा करणार्‍यांमध्ये महिलांचा प्रामुख्याने कल दिसून येत आहे. पतीपासून लपवलेली लक्षावधी रुपयांची रक्कम पोस्ट ऑफिसमध्ये ठेव म्हणून ठेवली जात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.हजार आणि पाचशेच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्यानंतर, पोस्ट ऑफिसमध्ये रक्कम ठेव म्हणून गुंतवण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. यामध्ये महिला वर्गाची विशेष गर्दी असून, बुधवारपर्यंंंत १ कोटी ६६ लाख ८0 हजार ९0८ रुपयांची बचत आणि आवर्ती ठेव जमा झाली आहे.- व्ही.एस. हिवराळेपोस्ट मास्तर, पोस्ट ऑफिस खामगाव.