शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी घातपाताची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:23 IST

इसोली : किन्ही नाईक बिटमध्ये  मृत अवस्थेत आढळलेल्या  बिबट्याप्रकरणी घातपात झाला असल्याची चर्चा होत असून, वन  विभागाने सखोल चौकशी करून बिबट्याच्या शिकारीस  कारणीभूत ठरलेल्याविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देकिन्ही नाईक बिटमध्ये आढळला होता मृत अवस्थेत वन विभागाने सखोल चौकशी करावी - मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कइसोली : किन्ही नाईक बिटमध्ये  मृत अवस्थेत आढळलेल्या  बिबट्याप्रकरणी घातपात झाला असल्याची चर्चा होत असून, वन  विभागाने सखोल चौकशी करून बिबट्याच्या शिकारीस  कारणीभूत ठरलेल्याविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.बुलडाणा वन विभागाच्या किन्ही नाईक बिटमध्ये वन विभागाच्या  हद्दीतील नाल्यावरील क्षेत्रात (मादी) बिबट्या मृत अवस्थेत  आढळल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. या  बिबट्याचे शवविच्छेदन चिखली तालुका पशुवैद्यकीय उपआयुक्त  डॉ.रंगतवार यांनी केले असून, या बिबट्याचा शवविच्छेदन  अहवाल उच्चस्तरीय तपासणीसाठी पाठविल्याचे बुलडाणा  परिक्षेत्राचे वन अधिकारी झोळे यांनी सांगितले. बुलडाणा वन विभागामध्ये इसोली बीट, धोत्रा नाईक बीट, किन्ही  नाईक या बीटमध्ये वन विभागाचे क्षेत्र मोठे असल्याने, या भागात  झाडाझुडुपे जास्त असल्याने, तर वन्य प्राण्यांना उन्हाळ्यातसुद्धा  पाण्याची टंचाई भासत नसल्याने या जंगलामध्ये रोही, हरिण तर   गावकर्‍यांच्या चर्चेनुसार ७ ते ८ बिबट असल्याची माहिती आहे.  या १४ ऑगस्ट रोजी उघडकीस आलेल्या घटनेनुसार वन  विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मृत पावलेल्या बिबट्याच्या छा तीला जबर मारहाण असल्याचा संशय शवविच्छेदन करण्यासाठी  आलेल्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सदर बिबट्या मृत्यू  हा एक घात असल्याची चर्चा होत असून, चौकशी करण्याची  मागणी होत आहे.