शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

प्रति जेजुरी  खामगावात खंडेरायाची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 11:53 IST

नवरात्रोत्सवानिमित्त श्री खंडेरायाची भव्य मिरवणूकही शहराच्या विविध मार्गावरून काढण्यात आली.

यळकोट यळकोट जय मल्हार!लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : 'यळकोट यळकोट जय मल्हार', 'सदानंदाचा यळकोट यळकोट', 'खंडेराव महाराज की जय हो' असा जयघोष करीत शेकडो भाविकांनी श्री खंडोबा नवरात्रोत्सवानिमित्ताने शिवाजी वेस भागातील पुरातन श्री खंडेराव महाराज मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. शेकडो भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या. दरम्यान, नवरात्रोत्सवानिमित्त श्री खंडेरायाची भव्य मिरवणूकही शहराच्या विविध मार्गावरून काढण्यात आली. येथील श्री शिव खंडोबा भक्त मंडळाच्यावतीने रविवारी  सकाळी श्री खंडेरायाचा नवरात्रोत्सवा विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सकाळी आरतीनंतर श्री खंडेरायाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत खंडोबाची शिखर काठी सर्वात अग्रभागी होती.   यावेळी  भाविकांच्या कपाळावर हळदीचा भंडारा लावून, तसेच प्रसादाचे वाटप केले जात होते.  मंदिर परिसरात वाघ्या-मुरळी यांनी खंडेरायाच्या गाण्यांवर ठेका धरला होता. यावेळी हळदीचा भंडारा उधळत असल्याने मंदिर परिसर आणि मिरवणूक  पिवळाधमक झालेला होता. देवाला नवसपूर्ती म्हणून वांग्याचे भरीत, बाजरीची भाकर तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा असल्याने भाविक मंदिरात नैवेद्य घेऊन जाताना दिसत होते. या दिवशी खंडेरायाचे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जात असल्याने भाविकांनी रात्री उशिरापावेतो मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. (वार्ताहर) 

टॅग्स :khamgaonखामगाव