शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था

By admin | Updated: May 25, 2017 00:50 IST

जामोद : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षीही कांद्याला भाव नसल्याने उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त आल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजामोद : दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच शेतकरी त्रस्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षीही कांद्याला भाव नसल्याने उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त आल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरात रब्बी हंगामामध्ये नगदी पीक म्हणून कांद्याची लागवड करण्यात येते. कांदा लागवडीला शेत तयार करण्यापासून तर कांदा काढणीपर्यंत जवळपास ४६ हजार ८०० रुपये खर्च येतो. खर्चाचा हिशेब केला असतानांगरणी ८०० रुपये, शेत सपाट करणे ५०० रुपये, सरी काढणे ५०० रुपये, कांद्याची रोपे तयार करणे १० हजार रुपये, कांदा लागवड खर्च ७ हजार रुपये, रासायनिक खत दोन वेळा ४ हजार रुपये, कांदा फवारणी ६ हजार रुपये, निंदन ५ हजार रुपये, पाणी देणे ३ हजार रुपये, कांदा काढणी १० हजार रुपये असा एका एकराला एकूण ४६ हजार ८०० रुपये खर्च आला; मात्र आज रोजी कांद्याची प्रत पाहून २५० ते ३२५ रुपये प्रति क्विंटल भाव सुरू आहे. कांदा पिकावर ३५ ते ४० हजार रुपयांचे एकरी उत्पन्न मिळत आहे. एकंदरीत जमा-खर्चाचा ताळमेळ केला असता, उत्पन्नापेक्षा ८ ते १० हजार रुपये खर्च जास्त झाला. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करता, कांदा पिकाला योग्य भाव देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.; मात्र कांद्याच्या कमी भावामुळे तोटा सहन करावा लागला. शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव नाही. शिवाय वारंवार येत असलेली अस्मानी संकटे व निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.यंदा दोन एकर कांद्याची लागवड केली होती. एकुण मिळालेले उत्पन्नापेक्षा १८ ते २० हजार रूपये खर्च जास्त झाला.- अनंता लक्ष्मण ताडे, शेतकरी जामोद.