शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणामुळे अंगणवाडी इमारतींचे बांधकाम रखडले!

By admin | Updated: July 11, 2017 00:45 IST

पंचायत समितीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ग्रामीण भागातील गोर-गरिबांच्या घरची चिमुकली शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत ग्रामीण भागात अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. अंगणवाडीच्या इमारत बांधकामासाठी शासन लाखो रुपये देत आहे; मात्र स्थानिक ग्रामपंचायत व राजकारणामुळे इमारत बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात असून, जवळपास ७० टक्के अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याचे दिसून येत आहे.जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सन २०१५-१६ यावर्षी ग्रामीण भागात १६६ अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली होती. प्रत्येक इमारतीसाठी पंचायत समितीमार्फत सहा लाख रुपये निधी शासनाकडून देण्यात येतो; परंतु अनेक ग्रामपंचायतीने अंगणवाडीच्या इमारतीसाठी पाठपुरावा केला नाही, तसेच संबंधित पंचायत समितीनेही अंगणवाडीची इमारत बांधकामाचा प्रस्ताव पाठविला की नाही, संबंधित ग्रामपंचायतीची काय अडचण आहे, याबाबत माहिती घेतली नाही, त्यामुळे १६६ पैकी फक्त ४९ अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यात बुलडाणा तालुक्यातील ५१ पैकी १८ इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. चिखली १९ पैकी १० पूर्ण, मेहकर १७ पैकी ४ पूर्ण, मोताळा १३ पैकी ७ पूर्ण, मलकापूर १२ पैकी २ पूर्ण, नांदुरा ८ पैकी ३ पूर्ण, खामगाव २२ पैकी २ पूर्ण, शेगाव ४ पैकी ०, जळगाव जामोद ६ पैकी १ पूर्ण, संग्रामपूर ७ पैकी ०, देऊळगाव राजा ६ पैकी १ पूर्ण व सिंदखेड राजा तालुक्यात १ पैकी १ इमारतीचे काम पूर्ण झाले असून, एकूण १६६ पैकी ४९ म्हणजे ३० टक्के इमारतीचे काम पूर्ण झाले असून, ७० टक्के अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याचे दिसून येते. यावर्षी सन २०१६-१७ यावर्षीही १६६ अंगणवाडीच्या इमारतीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे संबंधित पंचायत समिती व ग्रामपंचायतीने इमारत बांधकामासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.राजकारणाचा फटकाअंगणवाडी बांधकामासाठी संबंधित ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवून इमारत बांधकामासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे; मात्र अनेक ठिकाणी राजकारण आडवे येत असल्याचे दिसून येते. अंगणवाडी इमारतीसाठी निधी अल्प असल्यामुळे, इमारत बांधल्यानंतर काही शिल्लक राहत नसल्यामुळे तसेच तक्रारी दूर करताना त्रास होत असल्यामुळे अनेक पदाधिकारी अंगणवाडी इमारत बांधकामाकडे दुर्लक्ष करीत असून, जादा निधीच्या कामांकडे लक्ष देत असल्याचे दिसून येते.गावाच्या फायद्यासाठी अंगणवाडी इमारत बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.-सुनील मेहसरे, उपमुकाअ, महिला व बालकल्याण विभाग, जि.प.बुलडाणा.