शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कुंटणखान्याच्या संशयावरून पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:29 IST

देऊळगाव राजा : शहरातील मध्यवस्तीत कुंटणखाना  चालविल्या जात असल्याच्या संयशावरून पोलिसांनी २६ स प्टेंबर रोजी रात्री छापा टाकून तीन महिलांसह सहा जणांविरूध्द  कारवाई केली. दरम्यान प्रतिष्ठीत नागरिकांमार्फत होणार्‍या वारंवार  तक्रारीनंतर शनिवार पेठेतील कृष्णकुंज निवासस्थानासमोर  नागरिकांनी गर्दी केली होती. 

ठळक मुद्देवारंवार होणार्‍या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केलीशनिवार पेठेतील कृष्णकुंज निवासस्थानासमोर  नागरिकांनी गर्दी केली होती

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव राजा : शहरातील मध्यवस्तीत कुंटणखाना  चालविल्या जात असल्याच्या संयशावरून पोलिसांनी २६ स प्टेंबर रोजी रात्री छापा टाकून तीन महिलांसह सहा जणांविरूध्द  कारवाई केली. दरम्यान प्रतिष्ठीत नागरिकांमार्फत होणार्‍या वारंवार  तक्रारीनंतर शनिवार पेठेतील कृष्णकुंज निवासस्थानासमोर  नागरिकांनी गर्दी केली होती. शनिवारपेठ येथील कृष्णकुंज निवासस्थानाच्या मागील दिशेने  काही संशयीत महिला व पुरूषांची रेलचेल असते. त्याठिकाणी  कुंटणखाना चालविल्या जाते, अशा प्रकारच्या तक्रारी शनिवार पेठ व तांबटकर गल्लीतील नागरिकांनी पोलिस विभागाकडे  केल्या होत्या. सदर तक्रारीवरून मागील महिन्यात पोलिसांनी  काही महिलांना ताब्यात घेवून घरमालकास तंबी दिली होती.  बुधवारी सायंकाळी सदर निवासस्थानात काही महिला व  पुरूषांना जाताना पाहिल्यानंतर प्रतिष्ठीत नागरिकांनी पोलिसात  माहिती देत कारवाईची मागणी करताच ठाणेदार सारंग नवलकर  यांनी पोलिस कर्मचारी पाठविले. पोलिसांनी सदर घरासमोर व  मागील बाजूने एकाच वेळी दार ठोठावले मात्र दार उघडण्यात  आले नाही. तासभर पोलिसांसह नागरिक घरासमोर ताटकळत  असताना घरातील लोकांनी दार उघडले नाही शेवटी पोलिसांची  सहनशिलता संपली व त्यांनी मागील दिशेने असलेले दार तोडून  घरात प्रवेश केला व तीन महिला, तीन पुरूषांना ताब्यात घेतले. दरम्यान प्रतिष्ठीत वस्तीतील कृष्णकुंज या निवासस्थानी  आढळणार्‍या दादाराव हिवाळे पोखरी, किशोर अर्जुनदास उदासी  रा.शनिवारपेठ, संजय गुलाब पवार रा.किन्ही पवार यांच्यासह  तीन महिलांविरूध्द कारवाई केली आहे.