शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा जिल्ह्यातील १६ गुन्ह्यांचा पोलिसांनी लावला छडा; पाच आरोपी जेरबंद

By अनिल गवई | Updated: January 29, 2024 22:37 IST

शहर पोलिस स्टेशन हद्दीतील चार गुन्ह्यांचा समावेश

खामगाव : शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या दोन जबरी चोरींसह १४ घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच आरोपी जेरबंद केले असून, आणखी चार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या कारवाईत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये पत्र परिषदेत दिली.

जिल्ह्यात घडलेल्या चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांची गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पथके गठीत करण्यात आली. यात अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र समांतर तपास पथके तयार करून विविध गुन्ह्यांचा शोध घेण्यात आला. यामध्ये बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे (२२, रा. वीरेगाव तांडा, ता. जालना), विलास साहेबराव पवार (२५, रा. रामपुरी, ता. गेवराई, जि. बीड), अमोल सुरेश पवार (१९, रा. मंगरूळ, ता. घणसावंगी, जि. बीड), दीपक मारुती शिंदे (२०, रा. वीरेगाव तांडा, ता. जि. जालना), पांडू गंगाराम पवार (रा. मंगरूळ, ता. घनसावंगी) या पाच आरोपींना अटक करण्यात आली. तर आणखी चार आरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता थोरात यांनी वर्तविली. या पत्रपरिषदेला स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक लांडे, शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.पोलिस स्टेशननिहाय गुन्ह्यांचा छडा

खामगाव शहर - घरफोडीचे - ०४ गुन्हे.बोराखेडी- घरफोडी - ०१ व जबरी चोरी - ०१ गुन्हा.

चिखली - घरफोडी- ०३ गुन्हे.डोणगाव- घरफोडी - ०३ गुन्हे.

बुलढाणा शहर - जबरी चोरी ०१ गुन्हा.

मेहकर- घरफोडी ०१ गुन्हा.

देऊळगाव राजा - घरफोडी - ०१

अकोट, जि. अकोला- घरफोडीचा प्रयत्न - ०१पावणेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

कारवाईत सहा लाख ५१ हजार रुपये किमतीचे १०५ ग्रॅम सोने, २० हजार रुपये किमतीची २६४ ग्रॅम चांदी आणि गुन्ह्याशी संबंधित हत्यारे मुद्देमाल, असा एकूण सहा लाख ७१ हजार ०६४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.