शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

खामगावात दीडशे कोटींचा प्लॉट  खरेदी-विक्री घोटाळा : तलाठ्याने जमा केली कोट्यवधीची माया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 13:50 IST

या घोटाळ्यातून तलाठी चोपडे आणि महसूल मधील काही अधिकाºयांनी कोट्यवधींची माया जमविल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरात उघडकीस आलेला प्लॉट खरेदी-विक्रीचा घोळ हा दीडशे कोटींच्यावर जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. अनेकांची फसवणूक झाल्याने तलाठी चोपडेंसोबतच महसुल मधील काही अधिकारी यामध्ये गुंतल्याचे चित्र आहे. या घोटाळ्यातून तलाठी चोपडे आणि महसूल मधील काही अधिकाºयांनी कोट्यवधींची माया जमविल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.

खामगाव भाग- १ चा तलाठी राजेश चोपडे हा स्थानिक आणि बºयाच वर्षांपासून एकाच महसूल मंडळात असल्याने सुरूवातीला त्याने शहर आणि शहरालगतच्या विविध मालमत्ता आणि त्या मालमत्ता धारकांचा मुळ मालकांचा शोध घेतला. त्यानंतर मयत झालेल्या तसेच बाहेरगावी असलेल्या  मालमत्तांचे मुळ मालक बदलवून त्यांचे प्लॉट परस्पर विकून लक्षावधींची माया जमविली. शहरातील दोन फसवणूक प्रकरणात भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल असलेल्या आणि सद्यस्थितीत २२ दिवसांपासून फरारी असलेला तलाठी राजेश चोपडे याने शहरातील सुमारे ५४ पेक्षा जास्त प्लॉट धारकांची नोंद घेताना  खाडाखोड करून घोळ करण्यात आल्याचे उघडकीस आले. तलाठ्याचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर काही सामाजिक कार्यकत्यांच्या निवेदनावरून महसूल प्रशासन खळबळून जागे झाले. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी ९ सदस्यीस समिती नेमण्यात आली. यामध्ये अनेकांची मोठ्याप्रमाणात फसवणूक झाल्याचे दिसून येते.

 मंडळ अधिकाºयांची भूमिकाही संशयास्पद!तलाठ्याने प्लॉटची नोंद घेतल्यानंतर सदर प्लॉट महसूल दरबारी ‘रूजू’करणे  ही जबाबदारी मंडळअधिकाºयांची आहे. त्यामुळे तलाठी चोपडे याला मंडळ अधिकाºयाचे अभय असल्याचे दिसून येते. तहसीलदारांनी गतवर्षी   संगणकीकृत ७/१२ अपडेट करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी शहरातील सर्वच मालमत्ता अपडेट असल्याचा अहवाल मंडळ अधिकाºयांनी महसूल स्तरावर सादर केला. त्यामुळे शहरातील मुळ मालक बदलवून करण्यात आलेल्या प्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्यात  मंडळ अधिकाºयाची महत्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट होते.

 फसवणूक झालेल्यांनी संपर्काचे आवाहन!तलाठी चोपडे याने एकापेक्षा अनेकांना गंडा घातला आहे. आपल्याही काही मालमत्ता चोपडे परस्पर विकल्या आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह, महिला, शिक्षक, पोलिस आणि  न्यायालयीन कर्मचाºयांचाही समावेश आहे. मात्र, चोपडे हा बडा प्रस्थ असल्याने महसूल आणि पोलिसांकडून जनतेला न्याय मिळण्याची अपेक्षा घुसर झाली आहे. म्हणूनच प्लॉट खरेदी-विक्रीत फसवणूक झालेल्यांना न्याय देण्यासाठी आपण एक आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. फसवणूक झालेल्या संपर्क करावा, असे आवाहनही राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी केले आहे. तलाठी राजेश चोपडे याने शहरातील प्लॉट विक्रीत घोळ केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.  सद्यस्थितीत ५४ प्लॉटचे मूळ मालक बदलवून त्याने संगनमताने घोळ केला असून दोन प्रकरणांमध्ये त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. म्हणूनच त्याला निलंबित केले आहे. या घोटाळ्याची ९ सदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरू आहे. यामध्ये ४ तलाठी, ४ मंडळ अधिकारी आणि एका नायब तहसिलदारांचा समावेश आहे.- डॉ. शीतलकुमार रसाळप्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार, खामगाव.

 तलाठी चोपडे याने शंभरापेक्षा जणांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. त्याने अनेकांना गंडा घातला असून त्याला महसूल मधील काही वरिष्ठांची साथ असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मंडळ अधिकाºयांची भूमिका यामध्ये संशयास्पद आहे. चोपडेने अपसंपदेने मिळविलेली संपत्ती जप्त करून त्याच्या नातेवाईकांची चौकशी केली जावी.- देवेंद्र देशमुखराष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक, खामगाव.