शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

प्रहारचे थाली बजाओ आंदेालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:34 IST

ग्रामीण भागात नियमांचे उल्लंन सुरूच देऊळगाव राजा : लग्नसमारंभात २५ लाेकांनाच उपस्थित राहण्याची तसेच विवाह साेहळा दाेन तासांत ...

ग्रामीण भागात नियमांचे उल्लंन सुरूच

देऊळगाव राजा : लग्नसमारंभात २५ लाेकांनाच उपस्थित राहण्याची तसेच विवाह साेहळा दाेन तासांत संपवण्याचे बंधन प्रशासनाने घातले आहे़ मात्र, ग्रामीण भागात नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याचे चित्र आहे़ शहरात एका वधूपित्याला नगरपालिकेने नुकताच ५० हजार रुपयांचा दंड केला आहे़

आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या साक्षीचा सत्कार

देऊळगावराजा : अस्वलांचे संरक्षण या विषयावर साक्षी वाघ हिने कथा लिहिली. या कथेला डब्ल्यूसीबी रिसर्च फांउडेशनच्या वतीने सर्वोत्कृष्ट कथा म्हणून नुकताच आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. तिचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी काैतुक केले़ तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तिचा सत्कार केला़

काटेरी झुडपांमुळे अपघाताची शक्यता

माेताळा : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या कडेला असलेली लहान-मोठी झाडे तसेच काटेरी झाडे हे रहदारीच्या रस्त्याच्या माध्यभागापर्यंत येत असल्याने ते अपघातास निमंत्रण देत असून संबंधितांनी अशा झाडांची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी रस्ते हे खराब झालेले आहेत.

तीन हजार ८८५ शेतकऱ्यांना खताचा पुरवठा

बुलडाणा : जिल्ह्यातील एकूण १३५४ गावांतील ५ लाख २८ हजार ६६२ शेतकऱ्यांना एकूण ४०४ शेतकरी गटांच्या माध्यमातून बियाणे व खतांचा पुरवठा करण्यासाठी योजना सुरू केली आहे. मात्र, खतांच्या दरवाढीने यामध्ये अडसर निर्माण केल्याने केवळ ३ हजार ८८५ शेतकऱ्यांनीच २ हजार ४११.४ मेट्रिक टन खताची उचल केली आहे.

घाट नसलेल्या ठिकाणावरून रेतीचे उत्खनन

सिंदखेडराजा : तालुक्यातून वाहणाऱ्या खडकपूर्णा नदीपात्रातील वाळू उपसून वाहतूक करण्यासाठी नदीतील काही ठिकाणे रेती घाटांच्या स्वरूपात निश्चित करून त्याचे लिलावही झाले आहेत. यामध्ये सध्या वाळूची शासनाने ठरवलेली ठिकाणे सोडून यंत्रणेतील काहींना हाताशी धरत इतरही अनेक ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर जोरात वाळू उपसा सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

दुसरबीड : विद्युत वितरण अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे दुसरबीड परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, वरिष्ठांनी याबाबत तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

५ हजार ८५० लाभार्थींना शिवभोजनाचा लाभ

मेहकर : राज्य शासन शिवभोजनालयाच्या माध्यमातून मोफत दररोज ११ ते ३ या वेळेत शिवभोजन देत आहे. मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ५ हजार ८५० लाभार्थींनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे. शिवभाेजन थाळी गरजूंसाठी आधार ठरली आहे़

सिंदखेड लपाली येथे काेराेनाचा उद्रेक

माेताळा : शहरात ग्रामीण तालुक्यात काेराेनाचा उद्रेक हाेत असून सिंदखेड लपाली येथे शुक्रवारी ४१ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ तसेच काेथळी येथे २८, तळणी १०, इब्राहिमपूर ६ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे़ काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे़

रॉयल्टी नसणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई

सिंदखेड राजा : तालुक्यातील साठेगाव, हिवरखेड पूर्णा, तढेगाव येथील रेती घाट सुरू झाले आहेत. या रेती घाटातून रेतीची वाहतूक करताना रॉयल्टी घेऊनच रेती वाहतूक करण्यात यावी, अन्यथा दंड वसूल करण्यात येईल, अशा सूचना तहसीलदार सुनील सावंत यांनी दिल्या.

विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर ‘वॉच’

सिंदखेड राजा : संचारबंदी असताना नाहक रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांचा वॉच आहे. वाहनचालकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

मास्क वापराकडे दुर्लक्ष

किनगाव राजा : कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात वाढत असतानाच कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या त्रिसूत्रीचे ग्राहक व व्यापाऱ्यांकडून पालन होत नसल्याचे चित्र आहे. मास्क वापराकडेही दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात १००० व्यक्तीमागे सात जणांना कोरोना होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मास्क वापरणे गरजेचे झाले आहे.

चोरट्यांचा गुरांवर डोळा

देऊळगाव मही : भुरट्या चोरट्यांनी आता आपला मोर्चा गुरांकडे वळविला आहे. येथील एकनाथ सखाराम शिंगणे यांच्या मालकीची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.