यावेळी राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी भास्कर काळे, जि.प.सदस्य राजेश मापारी, सरपंच अरुण डव्हळे, शालीक पाटील, विश्वास डव्हळे, विष्णू राजगुरू, मोहण डव्हळे, शाळा समिती अध्यक्ष उषा डव्हळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. संत निरंकारी मंडळ लोणारचे मुखी राजेश इंगळे यांनी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन मिशन जगात कोणते कार्य करते, याविषयी माहिती दिली. यावेळी राजेश मापारी यांनी वृक्षसंवर्धन करण्यासाठी १०० ट्रीगार्ड देण्याचे आश्वासन दिले. भास्कर काळे यांनी वृक्षसंवर्धन साठी एक हजार रुपयांची देणगी नगदी स्वरूपात आर्थिक मदत दिली. वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवादल रामदास इंगोले, सेवादल संचालक विजय राजधर, प्रविण खंदारकर, कैलाश नेवरे, स्वाती नेवरे, मनिषा राठोड, स्वाती पवार, भारती जाधव यांनी परिश्रम घेतले.
संत निरंकारी मंडळद्वारे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:39 IST