शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

लाटा मंडोपत्सवापासून श्री बालाजी महाराजांच्या यात्रेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:19 IST

देऊळगावराजा : देऊळगावराजा ही बालाजी नगरी म्हणून  ओळखल्या जाते. सुमारे चारशे वर्षांंपूर्वीचा इतिहास असणारे श्री  बालाजी महाराज यात्रोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या  यात्रोत्सवाची सुरुवात आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून होत आहे.  दिवाळीनंतर या यात्रोत्सवाची सांगता होते. 

ठळक मुद्देबालाजी महाराज पालखी उत्सव ८ ऑक्टोबरला होणार लळितोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा : देऊळगावराजा ही बालाजी नगरी म्हणून  ओळखल्या जाते. सुमारे चारशे वर्षांंपूर्वीचा इतिहास असणारे श्री  बालाजी महाराज यात्रोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या  यात्रोत्सवाची सुरुवात आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून होत आहे.  दिवाळीनंतर या यात्रोत्सवाची सांगता होते. या उत्सवादरम्यान अनेक उत्सव साजरे करण्यात येत आहेत.  यातील लाटा मंडपोत्सव २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता  सुरुवात करण्यात आला आणि भक्तिभावाने हा लाटा मंडपो त्सव उत्साहाने पार पडला. या यात्रेत महाराष्ट्राच्या कानाको पर्‍यातून लाखो भक्त श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेण्याकरिता  शहरात दाखल होतात.   श्री बालाजी महाराज मूर्ती स्थापनेबाबत इतिहासात वेगवेगळी म ते मांडण्यात आली आहेत. २९ सप्टेंबर रोजी श्री बालाजी  महाराज यात्रोत्सवाची सुरुवात लाटा मंडोपत्सवापासून सुरू होते.  ८ ऑक्टोबर रोजी सकाळी सूर्यादोयनी लळित असते. लाटा मंडप  दसर्‍यापूर्वी मंदिरासमोर महाद्वारापासून शिसवीच्या २१ खांब  (लाटा) यांच्या साहाय्याने भव्य मंडप उभारून उत्सवाची  सुरुवात होते. या लाटा ३0 फूट उंचीच्या व दोन फूट व्यासाच्या  असून, दोन्ही बाजूने मिळून ४२ मंडप टाकले जातात. लाटा  उभारण्यासाठी श्री बालाजी महाराजांच्या दोर्‍या बालाजी संस् थानच्या समोरील असलेल्या गरुडाच्या तसेच महाद्वाराजवळील  हनुमंताच्या भव्य मूर्तीच्या हातामधील छेदामधून त्यांच्यामागे  असलेल्या दगडी खांबाला बांधण्यात येतात. पालखी मिरवणूक  दुसर्‍या दिवशी निघते. श्रवण नक्षत्रावर ‘श्रीं’ची सुमारे एक  िक्वंटल वजनाची चांदीची पत्रा लावलेली पालखी आमना नदी  काठावर गेल्यानंतर पुरातन काळातील विधीनुसार व प्रथेनुसार  आमना नदीतील ओट्यावर ठेवण्यात येते. त्या ठिकाणी श्रींचे  भ्राता तिरुपती बालाजी राजे जगदेवराव यांना त्याकाळी दिलेल्या  शब्दाप्रमाणे पालखीमध्ये प्रवेश करतात, अशी आख्यायिका  आहे. पालखी उत्सव आज रात्री १२ वाजता सुरु होणार आहे.  तसेच दि. ८ ऑक्टोबर रोजी लळित उत्सव साजरा होणार आहे.  मंडोपोत्सवामध्ये प्रत्येक जाती आणि समाजाला मान देण्यात  आलेला आहे. धार्मिक सोहळा लाटा मंडापोत्सवापासून सुरू  झालेला आहे. अनेक भाविक भक्त शहरात दाखल झाले आहे त.